- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar Police ः चोर काय चोरी करून नेतील, याचा नेम नाही. ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे चोरींच्या घटनांमध्ये अधिकच वाढ होणार अशी चिन्हे आहेत. यात चोरांनी शेतकऱ्यांचे चार बैल चोरून नेल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खर्डे येथे घडली आहे. काही संशयित आरोपींची माहिती पोलिसांनी घेतली आहे. या चोरीबाबत शेतकरी शिवनाथ बाबुराव घोरपडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या परिसरात शेतकऱ्यांची अनेक जनावरे चोरी गेली आहेत. शेतकरी शिवाजी घोरपडे यांनी गुरुवारी रात्री बैलांना चारा-वैरण करुन केले. तेव्हा चारही बैल गोठ्यात बांधलेले होते. घोरपडे शुक्रवारी सकाळी झापेतून उठले त्यावेळी गोठयाकडे गेले असता त्यांना गोठ्यामध्ये एकच…
Ahmednagar News : नगर तालुक्यातील घाट माथ्याशी असलेले पांढरीचा पूल येथे वाढत चाललेले अपघात रोखण्यासंदर्भात जागतिक बँक प्रकल्पा अभियंता यांनी रस्ते व सुरक्षा उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेने केली. या मागणीचे निवेदन संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यालयात देण्यात आले. तर अपघात रोखण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास पांढरी पुलावर ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पांढरीचा पूल (ता. नेवासा) हे ठिकाण घाट माथ्याशी असून, या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या ठिकाणी वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना करण्यात आली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातामध्ये अनेक नागरिकांना प्राण…
Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविद्यालयाच्यावतीने क्षयरोग प्रतिबंधक मोहिम राबविण्यात आली. क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर क्षयरोग आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी रॅली काढून मेळावा घेण्यात आला. क्षयरोग ही गंभीर समस्या निर्माण होत असताना क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी वडगाव गुप्ता येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्रात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करुन माहिती दिली. या मोहिमेत गावचे सरपंच विजय शेवाळे, ग्रामसेवक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश म्हस्के यांनी क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शन केले. आधुनिक वैद्यकिय शास्त्रातील निदान व उपचारामुळे आज क्षयरोग पुर्णतः बरा होतो.…
Book Publishing ः ‘आम्हा घरी धन.. शब्द हीच रत्ने’ असे जगतगुरु तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. प्रचंड वाचन केल्याशिवाय तो लेखक होऊ शकणार नाही. ‘दिसामाजी काही तरी लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचित जावे’ असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे. वाचनाने शब्द संग्रह वाढतो. ज्येष्ठराज या अंकात तुम्ही जे-जे साहित्य दिले ते अतिशय सुरेख आहे. प्रत्येक लेखातून बोध होतो. कविताही मनाचा ठाव घेतात. संतांची ग्रंथ संपदा अफाट आहे ते वाचल्यावर अध्यात्मिक व पारमार्थिक अशी विचारांची चिंतनाची सवय ज्येष्ठांना लागते. प्रचंड वाचन हे लेखकाचे मूळ भांडवल असते. ‘दुरावा’ ही कथा कारसेवेतील अनुभव ‘वाटसरु’ ही कविता तसेच ‘हट्टी पाऊस’ लेखन उत्कृष्ट आहे, असे विचार शुभदा…
Lok Sabha Elections2024 ः लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने नगर जिल्हा पोलीस दल अॅक्शन मोडमध्ये आलेत. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली. यात विशेष करून हातभट्टी दारू, अवैध विदेशी दारू आणि जुगार चालकांविरोधात कारवाई केली गेली. या कारवाईवरून नगर जिल्ह्यात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची पुष्टी मिळते. लोकसभा निवडणुकीपुरती ही कारवाई नको, तर त्यात सातत्य हवे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या कारवाईसाठी विविध पथके तयार केली आहेत. गेल्या तीन दिवसात पथकांने 66 गुन्हे दाखल करत 78 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत…
Ahmednagar Political : नीलेश लंके यांनी आपल्या पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवून देत, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकले आहे. आमदारकीचा राजीनामा देताना नीलेश लंके यांनी अगोदर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे. अजितदादा मला नक्की माफ करतील आणि मला समजावून घेतली, असे म्हणताच नीलेश लंके यांना हुंदका फुटला. त्यांच्या खूप पैसा आहे. यंत्रणा आहे. पण माझ्यासोबत जनता आहे. मी त्यांची दडपशाही संपविण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असे म्हणत नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. संतोष इथापे अध्यक्षस्थानी होते. नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काल सुपा (ता. पारनेर) येथे…
Nagar News :आपणास वाटते की बँक बंद करुन खूप मोठे काम केले, बँक वाचवली परंतु प्रत्यक्षात असे काहीही झालेले नसून आपल्या कृत्यानेच नगर अर्बन बँकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे बँक बचाव संघर्ष समितीचे कार्य त्वरीत थांबवावे, असे आवाहन नगर अर्बन बँकेचे सभासद अन्वर खान यांनी केले आहे. तर खान यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाले आहे. सोशल मीडियावर बँकेच्या ठेवीदारांनी धारेवर धरले असून, खानसाहेब, बँकेत अडकलेले आमचे पैसे तुम्हीच आता परत करा, अशी मागणी केली आहे. बँक बचाव संघर्ष समितीने ठेवीदार व सभासदांना एकजूट होण्याचे आवाहन केले व उदासीनता दाखविल्यास संघर्ष समिती यापुढे काम थांबविणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर,…
Shirdi Lok Sabha Election ः राज्यात महायुतीकडून दोन तरी जागा मिळाल्या पाहिजे होत्या. शिर्डीची जागा आम्हाला महत्त्वाची होती. ती रिपाईला पाहिजेच होती. परंतु महायुतीत रिपाईला निवडणुकीत काही मिळाले नाही. तरी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. यानंतर रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत राहणार असल्याचे जाहीर केले. मंत्री रामदास आठवले म्हणाले, “महायुतीत आम्ही दहा वर्षांपासून आहोत. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे पूर्ण झाली आहे. संविधानाला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत. राज्यात महायुतीसोबत आहोत. या निवडणुकीत एखादी जागा मिळाली असती, तर बरे झाले असते. ईशान्य मुंबई मिळाली…
Nagar District Cooperative Bank ः सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदान रक्कम वजा करून परत फेडीची रक्कम वसूल करण्याचा निर्णय 27 मार्चला सहकार आयुक्तांनी घेतला. यानुसार नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चालू अथकीत वसुलास पात्र पिक कर्ज वसुलीबाबत फक्त मुद्दल कर्ज वसूल करणेबाबत निर्णय झाला आहे. या निर्णयाची माहिती नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांना सविस्तर सूचना कळविल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू वर्षात 2 हजार 995 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. या चालू वर्षात आज अखेर 4 हजार 674 कोटीचे पिक वसुलास पात्र आहेत. त्यातील…
Kedgaon Shiv Jayanti ः नगर शहरातील केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्थेसमोर संदीपदादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांची सिंहासनावरील आकर्षक मूर्ती अभिवादनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी युवकांनी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आणि उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, संदीपदादा युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, भाऊ बारस्कर, माजी नगरसेविका लता शेळके, गौरी ननावरे, सविता…