- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Abacus Competition ः अहमदनगर शहरात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने शहरात घेण्यात आलेली विभागीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून, अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. ही स्पर्धा केजी, ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 7 व वैदिक मॅथ्स या गटात पार पडली. 5 मिनीटाच्या राऊंडमध्ये अवघड गणिती प्रक्रियेचे पेपर विद्यार्थ्यांनी अत्यंत जलदगतीने सोडविली. दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा पार…
Gnanvardhini Competitive Exam ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाद्वारा आयोजित जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील राळेगण येथील श्रीराम विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तर जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वाधिक शिष्यवृती धारकामध्ये विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे यांच्या मातोश्री भिवराबाई दरे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या गुणवंतांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. स्कॉलरशिपच्या धर्तीवर परीक्षेचे स्वरूप असून 300 गुणांची ही परीक्षा सहावी व सातवी या वर्गासाठी घेतली जाते. विद्यालयाचे सहावीतील गुणवत्ताधारक – पूर्वा ज्ञानेश्वर कोतकर (तृतीय क्रमांक), समृद्धी अर्जून खराडे (चतुर्थ क्रमांक), अविष्कार प्रशांत दुरेकर (पाचवा क्रमांक); सातवीतील गुणवत्ता धारक…
Nagar ZP Education Department ः मार्च अखेरला नगर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे तीन वर्षापासूनची सर्व प्रकारची थकीत पुरवणी, वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले व सातव्या वेतन आयोगाचे 1 ते 4 पर्यंतचे थकीत हप्ते मिळण्याची कार्यवाही पूर्ण झाली. याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधिक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर व कार्यालय अधीक्षक सुभाष कराळे यांचा जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानदेव बेरड, शिक्षक परिषदेचे कार्यवाह…
Maharashtra Political ः सरकारी कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक 1 एप्रिलला बदलला गेला आहे. विधानपरिषद उपसभापतींच्या दालनाबाहेर ‘डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे’ असा नामफलक लावला आहे. राज्यातील नागरिकांना आता सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यावेळी सदर निर्णयाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले होते, त्याची अंमलबजावणी देखील त्यांनी केली आहे. माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे…
Nagar Collector meeting ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, दिव्यांग व्यवस्थापक नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त समाज कल्याण राधाकिसण देवढे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्याग पुर्णवसन केंद्र विळद घाट डॉ. दिपक अनाप उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, रॅम सुविधा, वाहतुक…
Shri Kshetra Madhi Kanifnath Temple ः पाथर्डीतील श्री क्षेत्र मढी कानिफनाथ देवस्थानच्या परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना आज चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना मढी येथे घडली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीच्या वेळी जोरदार दगडफेक झाली. यात एका चारचाकी वाहनाच्या काचा सुद्धा फुटल्या. देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार ते पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मढी देवस्थानने तीन वर्षांपूर्वी कानिफनाथ मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास बंदी घातली होती. या निर्णयावरून पूर्वी वादही झाले होते. चालू वर्षी सुद्धा मंदिर परिसरात पशुहत्या करू नका, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केले होते. यासाठी…
Ahmednagar News ः रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदान येथे स्वच्छता, प्रत्येक मशिद समोर स्वच्छता करुन औषध फवारणी करणे तसेच ईदच्या आदल्यादिवशी एक तास अधिकचे पाणीपुरवठा करण्याबाबत आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेवून निवेदन दिले. आयुक्त जावळे यांनी स्वछतेबाबत तातडीने सबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करु नये, याबाबतचे निवेदन विद्युत महावितरण कार्यालयास देण्यात आले. यावेळी साहेबान जहागीरदार, मुजाहिद सय्यद, रईस उर्फ मुज्जू, खालिद शेख, शेरू शेख, शाहनवाज शेख, अब्दुल खोकर, मारुफ सय्यद, शाहरुख शेख, अकरम शेख, फैजान शेख, हुजेफा खान, अकिल…
Ahmednagar Political ः शिवसेना शिंदे गटाच्या ऑल इंडिया उलमा बोर्डचे राष्ट्रीय महासचिव अंजर अन्वर खान यांच्यासह अनेक अल्पसंख्याक समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता. आज अंजर अन्वर खान यांची अल्पसंख्याक विभागाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेता इरफान सय्यद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले, “शिवसेना ही हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने काम करत आहे. जनतेची कामे व्हावी व त्यांचे जीवनमान उंच व्हावे, यासाठी विविध योजना सुरू केल्या आहे.…
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक मोहम्मद युसुफ तांबोळी यांच्या 25 वर्ष सेवेत समाजशास्त्राचे शिक्षक म्हणून सेवा झाली. सन 1998 ते 2024 पर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले व त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम संस्थेच्यावतीने गौरवपूर्वक सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष सय्यद मतीन, उपाध्यक्ष सय्यद अजगर, सचिव शेख तनवीर चांद, खजिनदार शफिक कासमि, नसीर शेख,सय्यद सादिक, गुलाम शेख, मुशाहिद शेख, मन्सूर सय्यद, प्राचार्य समी शेख, उप प्राचार्य शफी तांबोळी, प्रोफेसर अलीम हुंडेकरी, प्राचार्य नासीर खान उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य समी शेख म्हणाले, 25 वर्ष सेवा देणारे ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद तांबोळी यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. 1998 साली ते शाळेत…
Ahmednagar Sport : नगर शहरातील देवेंद्र वैद्य हा बिहार पटना येथे झालेल्या 24 व्या नॅशनल चेस चॅम्पियन स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. देवेंद्र याची सर्बिया येथे जून महिन्यामध्ये होणाऱ्या वर्ल्ड बुद्धिबळ डेप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. देवेंद्र वैद्य याने मिळवलेल्या या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, माजी सभापती अविनाश घुले, दिनेश जोशी, मंगेश खताळ, गजेंद्र भांडवलकर, दिलीप पवार, अजय गांधी आणि आंबादास नामदे उपस्थित होते . आमदार संग्राम जगताप म्हणाले, “देवेंद्र वैद्य यानी बुद्धिबळ क्रीडा प्रकारामध्ये आपल्या शहराचे नाव देशपातळीवर घेऊन जाण्याचे काम केले. आता त्याची निवड वर्ल्ड बुद्धिबळ स्पर्धेसाठी…