- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar Police ः नगर अर्बन बँकेतअडकलेले आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या ठेवीदारांना शुक्रवारी पोलिसांनीही आणखी अस्वस्थ केले. बँक बुडवणार्या दोषींवर कारवाई करावी व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत म्हणून उपोषणास बसलेल्या ठेवीदारांनी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून उपोषणस्थळी टाकलेला छोटा मंडप पोलिसांनी काढून नेला. परिणामी, रणरणत्या उन्हात ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय् आंदोलन केले. पोलिसांच्या या कृतीबद्दल निराशा व नाराजीही व्यक्त केली. नगर अर्बन बँकेत 292 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे व फॉरेन्सिक ऑडीटनुसार सुमारे 105जण यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतील 8 ते 10जणांना पोलिसांनी पकडले आहे व बाकीचे सापडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, नगर अर्बन…
Ahmednagar News ः स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून बँकेकडून 85 लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या प्रकरणी डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. महादेव अर्पाटमेंट, पाईपलाईन रस्ता, सावेडी) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर, नगर) या दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सेवाभावी रेंज फाऊंडेशन सोसायटी आणि शेवगावच्या आखेगावमधील बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठान, या दोन्ही स्वयंसेवी संस्था आहेत. साई एंजल स्कूल बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठानमार्फत संचलित केले जाते. डॉ. राकेश गांधी आणि डॉ. आशिष भंडारी यांनी 9 ते 12 फेब्रुवारी 2023 दरम्यान दोन्ही संस्थांच्या…
Lok Sabha Election2024 : अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 टक्के मतदानाची भूमिका बजवावी. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या संकल्पनेतून “मै तेरा-13मे” या रिल्स बनविणे स्पर्धेचे अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. बनविण्यात आलेल्या रिल्स, व्हिडिओ 9002109003 या व्हाट्सअप क्रमांकावर 10मे 2024 पर्यंत पाठविण्याचे आवाहनही स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मी माझ्या लोकशाहीचा पाईक असून 13 मे रोजी मतदान करून लोकशाहीतील या महत्त्वपूर्ण दिवसाचा सन्मान करील, या भावनेने या स्पर्धेचे नाव “मै तेरा- 13मे…” असे ठेवण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना भरघोस पारितोषिके प्रदान केली जाणार आहे. स्पर्धेसाठी उत्सव…
Ahmednagar Crime Newsः व्याजाने घेतलेल्या 60 हजार रूपयांच्या बदल्यात एक लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली. यानंतर देखील दमबाजी करून घर नावावर करून घेतले. नगरमधील अवैध सावकारीचा हा प्रकार समोर आला आहे. महिलेविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांता बाळासाहेब वाघ (रा. लांडेगल्ली, नालेगाव, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुक्याचे सहकार अधिकारी (श्रेणी 2) शेख अलताफ अब्दुलकादर (वय 42, रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. शंतनु सतीष दळवी (रा. बागडे मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जानुसार ‘शांता बाळासाहेब…
Theft of Gold ः चोराने सफाईदारपणे हातचलाखी करत महिलेच्या हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली. महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोराने ही चोरी केली. राहुरी बसस्थानकावर ही घटना घडली. कावेरी गोरख तांबोळी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. कावेरी या लग्न समारंभासाठी बाहेरगावी जायचे असल्याने त्या १ मे रोजी सकाळी १० वाजता राहुरी बस स्थानकात गेल्या. त्यावेळी त्या नाशिक-परळी या एसटी बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढत असताना काही मुलांनी त्यांना गर्दीचा फायदा घेत लोटले. बसमध्ये गर्दी असल्याने त्या बसमधून खाली उतरल्या. कावेरी तांबोळी यानंतर त्या तुळजापुर बसमध्ये बसल्या. ती बस राहुरी खुर्द येथून जात असताना…
Ahmednagar Education Meeting ः “शैक्षणिक धोरणात औद्योगिक क्षेत्राचा सहभाग खूप महत्वाचा आहे. समाजाभिमुख सुविधांसाठी नगरमध्ये काय चांगले करता येईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आजपर्यंत विद्यापीठ व इंडस्ट्रीज कधीच एकत्र आले नाहीत. विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे शिक्षण घेत असताना त्यांना अनुभवासाठी कारखान्यांमध्ये प्रात्यक्षिक करता यावे यासाठी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी पुढाकार घेत पुणे विद्यापीठ व औद्योगिक हे दोन्ही क्षेत्र एकत्रित आले आहेत. पुण्यामध्ये केमिकल, मॅन्यूफॅरिंग, पॉलीमर व प्लास्टिक क्लस्टर, सिए व सामाजिक संघटनांचा एकत्रित ग्रुप करून विद्यार्थ्यांसाठी आपले योगदान देत आहेत. नगरमधेही हा प्रयोग करण्यास हरकत नाही. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आमी संघटना व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने नगरमध्ये एका कार्यक्रमाचे…
Fraud of businessman in Ahmednagar ः जुनी वास्तू पाडून त्या ठिकाणी नवीन वास्तू बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाशी केलेल्या विकसन करारापोटी घेतलेली 98 लाख 99 हजार 811 रूपये रक्कमेचा अपहार केला. तसेच सदरची मिळकत दुसर्या दोन व्यक्तींना विकून व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव (वय 49 रा. बोल्हेगाव फाटा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. गिरीष प्रकाश लोखंडे, कांता प्रकाश लोखंडे, ज्ञानेश्वर मनोहर लोखंडे (तिघे रा. सिव्हिल हाडको, सावेडी, नगर), चंद्रकांत मनोहर लोखंडे, शोभा चंद्रकांत लोखंडे (दोघे रा. हवेली, जि. पुणे), पद्मा ज्ञानेश्वर लोखंडे (रा. सिव्हिल…
Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Sweep Care Whatsapp Number : “मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रम राज्यात चालू आहेत.यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होणार आहे.सक्षम लोकशाही समृद्ध करण्याकरिता प्रत्येक मतदाराने महत्त्वाचे योगदान देणे गरजेचे आहे.याकरिता “एक जिल्हा – एक व्हाट्सअप नंबर ” या संकल्पनेवर आधारित अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा देशातला पहिला स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांकाचा प्रयोग हा इतरांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.यामुळे स्वीप उपक्रमांचे संकलन सुलभ व सोपे होणार आहे व संपर्क साधण्यासाठी हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अहमदनगर सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार वैशिष्ट्यपर्ण स्वीप उपक्रम जिल्ह्यात…
Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात सकाळी सकाळीच सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला. भिस्तबाग रस्त्यावरील वृंदावन कॉलनीत दोन ठिकाणी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून चोरांनी दुचाकीवरून धूम ठोकली. दोन्ही घटनेत सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गीता मुकुंद देशमुख (वय 49 रा. श्रीनाथ कॉलनी, रासणेनगर, सावेडी) या सोमवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास वृंदावन कॉलनी येथून रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या समोरून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने गीता यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबडून धूम ठोकली. याप्रकरणी गीता यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी…
Ahmednagar News : “आपल्याकडे अनेक महान राष्ट्रपुरुष झाले आहेत. त्यांचे कार्य व पराक्रम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र या राष्ट्रपुरुषांचा वापर केवळ जात, पुतळे व राजकारणासाठीच होत असल्याने खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाहीये. मात्र अद्याप महाराज आपल्याला समजलेच नाहीयेत. यासाठी सर्वप्रथम त्यांचे विचार आत्मसात करा. रांगोळीची परंपरा ही श्रीरामाच्या काळापासून चालत आली आहे. ही परंपरा जपत महाराजांच्या जीवनावर अतिशय बोलक्या रांगोळ्या कलारंगच्या कलाकारांनी रेखाटल्या आहेत. सुजाता पायमोडे यांनी या कलेला आधुनिक रूप दिले आहे. ही कला अजून बहरत जावो”, अशा शुभेच्छा पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिल्या. कलारंग अकॅडमी, चौपाटी मित्र मंडळ आणि…