Maratha Reservation News ः मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे ठाम आहे. यावरून मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून देत, मुंबईकडे जाण्याची भूमिका घेतली आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, सरकारने देखील मराठा आंदोलकांना जशाच तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे.
मनोज जरांगे हे मुंबईला जाणार होते. परंतु ते पुन्हा अंतरली सराटीमध्ये आले आहेत. मराठा समाजाला त्यांनी बोलावून घेतले आहे. यातच पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या पाच सहकार्यांना जालना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. तसेच मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजातील आंदोलकांना रास्ता रोकोची हाक दिली होती. त्यावर देखील गुन्हे दाखल केले जात आहे. यामुळे मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक झाले आहे. यावरून राज्यात पुन्हा मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. जालना येथील अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून, आज सकाळी अंबडमध्ये मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिली. यानंतर तणाव अधिकच वाढला आहे.
याशिवाय सरकारकडून मराठवाड्यातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत केली आहे. जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मनोज जरांगे यांनी रविवारी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर वातावरण चिघळले आहे.जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात गोळा होण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईला जाऊ नये, यासाठी आंदोलक उपोषण करणार आहेत. आंदोलक मोठ्या प्रमाणात जमू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने तीनही जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच धुळे-मुंबई महामार्गावर वाहतूक अडचण होऊ नये, म्हणून वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच एसटी बसची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे. दुसरीकडे जालन्याच्या अंबड तालुक्यात पुढील आदेश येईपर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे, असे सांगण्यात आले आहे.