दुचाकीच्या डिक्कीत तलवार आणि कोयता बाळगणाऱ्या दाेघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून 15 जुलैला सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. ईशान सलीम शेख (वय 19, रा. कोठला घासगल्ली, अहमदनगर), उदय हमीद खान (वय 20, रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
जुन्या महापालिकेजवळ दोन जण दुचाकीच्या डिक्कीत तलवार आणि कोयता बाळगून गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शाेध पथकाला तात्काळ कारवाईचा आदेश दिला. पथकाने जुन्या महापालिकेजवळ सापळा लावून दुचाकीवरून येत असलेल्या संशयित दोघांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतल्यावर तलवार आणि कोयता आढळून आले.
या दाेघांन तलवार व कोयता आपलीच असल्याची माहिती पाेलिसांना चाैकशीत दिली. पाेलिस शिपाई अतुल केशव काजळे यांनी फिर्याद दिली आहे. निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सलीम शेख तपास करत आहेत.
दरम्यान, गुन्हेविषयक कारवाईविराेधात काेतवाली पाेलिस आक्रमक झाले आहे. शस्त्रास्त्राचा धाक दाखवून विनाकारण काेण त्रास देत असल्यास काेतवाली पाेलिसांशी संपर्क साधावा. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या किंवा दादागिरी करणाऱ्यांची कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.