साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात थेट कर्ज योजनेसाठी 50 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. यात मातंग समाज व त्यामधील पोटजातीतील व्यक्तींना व्यवसायाकरिता अर्थसाह्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
थेट कर्ज योजनानांतर्गत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपयापर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणांमध्ये प्रकल्प खर्चाच्या 85 टक्के कर्ज, अनुदान 10 हजार रुपये व लाभार्थी सहभाग पाच हजार रुपये आहे. इच्छुकांनी व्यवसाय संबंधी कागदपत्रासह दोन प्रतीत अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अहमदनगर-मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर इथं 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत दाखल करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी (0241) 2995517 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.