Amrit Mahaavas Mission Award ः विभाग आणि राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत सन 2020-21, 2022-23 कालावधीत अत्युकृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी ‘अमृत महाआवास अभियान’तही चांगले काम करुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांचा सन्मान राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘अमृत महा आवास अभियान’व ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अर्जुन गुंडे, नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपायुक्त (विकास) उज्ज्वला बावके, महसूल प्रबोधनीच्या संचालिका जयरेखा निकुंभ, सहा आयुक्त मनोज चौधर आदी उपस्थित होते. अमृत महाआवास अभियानात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक व राज्य पुरस्कृत योजनेत ही प्रथम क्रमांक मिळाला. अहमदनगर जिल्ह्यास बारा मानांकनात एकूण 14 पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल विभागीय आयुक्त नाशिक यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विशेष कौतुक केले.
यशवंत पंचायत राज अभियान राज्य स्तर पुरस्कार सन 2022-23 ः अहमदनगर जिल्ह्यातील तालुका राहता येथील पंचायत समितीला तिसऱ्या क्रमांकाचे रुपये 15 लाखाचे बक्षिस मिळाले.
यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर पुरस्कार सन 2020-21
1. पंचायत समिती, राहता जि.अहमदनगर प्रथम क्रमांक, बक्षिस रुपये 11 लाख
2. पंचायत समिती, नाशिक द्वितीय क्रमांक, बक्षिस रुपये 8 लाख
3. पंचायत समिती, कळवण जि.नाशिक तृतीय क्रमांक, बक्षिस रुपये 6 लाख
यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर पुरस्कार सन 2022-23
1. पंचायत समिती, राहता जि.अहमदनगर प्रथम क्रमांक, बक्षिस रुपये 11 लाख
2. पंचायत समिती, पारोळा जि.जळगाव द्वितीय क्रमांक, बक्षिस रुपये 8 लाख
3. पंचायत समिती, संगमनेर जि.अहमदनगर तृतीय क्रमांक, बक्षिस रुपये 6 लाख
गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार : सन 2019-20
प्रदीप काशिनाथ वर्पे (सहायक लेखाधिकारी, जिल्हा परिषद, नगर), एकनाथ ढाकणे (ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद नगर), अजय चौधरी (आरोग्य पर्यवेक्षक,जळगाव), समर्थ शेवाळे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, ता. राहाता, जि. नगर), इंद्रसिंग राजपूत (विस्तार अधिकारी, सांख्यिकी, जिल्हा परिषद नंदूरबार), अंबादास पाटील (वरिष्ठ सहायक, जिल्हा परिषद, नाशिक)
गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार : सन 2020-21
मनोज आहिरराव (वरिष्ठ सहायक, जिल्हा परिषद नंदूरबार), विलास बोंडे (विस्तार अधिकारी, सांख्यिकी, जिल्हा परिषद, जळगाव), सतिष सिसोदे (शाखा अभियंता, जिल्हा परिषद जळगाव), अशोक कदम (वरिष्ठ सहायक, जिल्हा परिषद, नगर), प्रदीप आहिरे (वरिष्ठ सहायक, जिल्हा परिषद, नाशिक)
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: जळगाव जिल्हा
तृतीय क्रमांक: धुळे जिल्हा
प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: ता.पाथर्डी जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.जामनेर, जि.जळगाव
तृतीय क्रमांक: ता.कर्जत जि.अहमदनगर
प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
प्रथम क्रमांक: ग्रा.पं. मालेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.कुशेगाव ता.इगतपुरी, जि.नाशिक
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. नागोसली, ता.इगतपुरी, जि.नाशिक
विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल
प्रथम क्रमांक :-ग्रा.पं. हनुमंत खेडे, ता.धरणगाव, जि. जळगाव
द्वितीय क्रमांक :-ग्रा.पं. भोलाणे, ता.पारोळा, जि. जळगाव
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. सुपे, ता.कर्जत, जि.अहमदनगर
विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अपार्टमेंट)
प्रथम क्रमांक :-ग्रा.पं. उपखेड, ता.चाळीसगाव, जि. जळगाव
द्वितीय क्रमांक :-ग्रा.पं. वागदरी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. कोळपिंपरी, ता.पारोळा, जि.जळगाव
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके
प्रथम क्रमांक: ता. जामनेर. जि.जळगाव
द्वितीय क्रमांक: ता.निफाड, जि. नाशिक
तृतीय क्रमांक: ता.नांदगाव, जि. नाशिक
राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: जळगाव जिल्हा
तृतीय क्रमांक: नंदूरबार जिल्हा
राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: ता.जामखेड जि.अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.शेवगाव, जि. अहमदनगर
तृतीय क्रमांक: ता.नेवासा, जि. अहमदनगर
राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.अरणगाव ता.जामखेड जि.अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.गोलेगाव, ता.शेगाव जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं.नागापूर, ता.नांदगाव, जि.नाशिक
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके
प्रथम क्रमांक: ता.ईगतपुरी जि.नाशिक
द्वितीय क्रमांक: ता.बागलाण, जि. नाशिक
तृतीय क्रमांक: ता.जळगाव, जि.जळगाव
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.निंभारा, ता.धरणगाव, जि.जळगाव
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.शिरसगाव, ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं.अंतापूर, ता.बागलाण, जि.नाशिक
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अर्पामेंट)
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.नांदगाव,जि.अहमदनगर