केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबींचा खुलासा केला आहे. देशातील अनेक शहरांचे नामांतर, नक्षलवाद, ईशान्य भारतातील परिस्थिती, अतंकवाद, आंतरराष्ट्रीय पातळवर वाढलेला भारताचा दबदबा आदी मुद्यांवर अमित शहा यांनी मते मांडली. नामांतरावर ते स्पष्टच बाेलले, देशातील अनेक शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे येत आहे. देशातील एकही शहर असे नाही की, त्याचे नाव बदलेले गेलेले नाही. याबाबत सरकारने खूप विचार केलाय आणि तसा प्रत्येक सरकारला याबाबत कायदेशीर अधिकार आहे. पंतप्रधान मोदींनी ईशान्य आणि उर्वरित भारतातील अंतर संपवले आहे. आज ईशान्येतील लोकांच्या मनात असे वाटते की इतर भागांमध्ये आपला आदर आहे. इतर राज्यांतील लोक ईशान्येकडे गेले तर त्यांचाही आदर करतात, असेही अमित शहा यांनी सांगितले.
अमित शहा यांनी मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्यांना स्पर्श करत म्हणाले, “पंजाब सरकारशी आम्ही खलिस्तानबाबत चर्चा करत असतो. सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकारची आकडेवारी उत्तम स्थितीत आहे. कोट्यवधी प्रवासी जम्मू-काश्मीरला जात आहेत. एक मोठा बदल आहे. 370 हा सुरुवातीपासूनच आमचा अजेंडा आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येत आहे. देशाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाण्याचा भाजपचा मुद्दा आहे”.
बीसीसी डॉक्युमेंटरीबाबत अमित शाह म्हणाले की, “सत्याविरुद्ध कट रचल्याने काहीही निष्पन्न होत नाही. 2002 पासून लोक मोदींना फॉलो करत आहेत. सर्व निवडणुका एकत्र घेण्याची कल्पना पंतप्रधान मोदींनी मांडली आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे माझे मत आहे. यावर प्रत्येकाला चर्चा करावी लागेल. दरवर्षी, प्रत्येक महिन्यात होणाऱ्या निवडणुकाही लोकशाहीसाठी चांगल्या नाहीत. अदानीबाबत भाजपला घाबरण्याची गरज नाही. भाजपवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. जे एजन्सींवर आरोप करतात ते कोर्टात जातात”. अदानी प्रकरणावर भाजपकडे लपवण्यासारखे काही नाही. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे, त्यामुळे आम्ही यावर जास्त बोलणार नाही, असेही अमित शहा यांनी सांगितले.
पीएफआय लोक दहशतवादाचा कच्चा माल तयार करतात. हे देशासाठी धोक्याचे होते. आमच्याकडे पीएफआयविरोधात भक्कम पुरावे आहेत. पीएफआयकडून देशाची अखंडता धोक्यात आली होती. शांततेमुळे विकास शक्य झाला आहे. शांततेमुळे शिक्षण पद्धती बदलली आहे. आम्ही त्रिपुराचे संपूर्ण चित्र बदलले आहे.रेल्वेचाही लवकरच विकास केला जाईल. त्रिपुरातील हिंसाचाराचे वातावरण आम्ही संपवले आहे. ईशान्येतील बंडखोरी नष्ट झाली आहे. आदिवासी समाजासाठी सरकारने अनेक मोठी कामे केली आहेत, असेही अमित शहा यांनी सांगितले. देशभरात ईशान्येचा स्वीकार वाढला आहे. पीएम मोदींनी आतापर्यंत 51 वेळा ईशान्येला भेट दिली आहे. मोदी सरकारने ईशान्येचा बदल केल्याचा दावा अमित शहा यांनी केला.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक