शालेय विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या व सुवर्ण मोहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या ‘अएसो’चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने आंतर शालेय कथाकथन व नाट्य वाचन स्पर्धा 19 व 20 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही दिवस स्पर्धा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे होणार आहेत. 20 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल.
सरलाबाई पोपटलाल काठेड यांच्या स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा असून ईश्वर पोपटलाल काठेड त्याचे प्रायोजक आहेत. तसेच पुष्पलता मधुकर देशमुख यांचे स्मरणार्थ नाट्य वाचन स्पर्धा असून नीलकंठराव देशमुख त्याचे प्रायोजक आहेत. या दोन्ही स्पर्धांना आकर्षक रोख बक्षीसे देण्यात येतात. तसेच कथाकथनव नाट्य वाचन स्पर्धा यांना सांघिक फिरता करंडक देखील आहे. या स्पर्धेत भाग घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे जावून चमकले आहेत. सर्व शाळांना स्पर्धेचे माहिती पत्रक पाठविण्यात आलेले असून प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट आहे, त्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत प्रवेश अर्ज फिरोदिया हायस्कूलच्या जपे वाचन मंदिरात ग्रंथपाल प्रमोद अंकम यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे, याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेची अधिक माहिती हवी असल्यास सचिव व स्पर्धा प्रमुख पी. डी. कुलकर्णी यांचेशी 9850057222 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन अध्यक्ष पद्माकर देशपांडे यांनी केले आहे.