अहमदनगर ः बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी बस आणि रुग्णावाहिकेला हे अपघात झाले आहेत. खासगी बसच्या अपघातात सहा, तर रुग्णवाहिकेच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल आहे.
नगर-जामखेड महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. खासगी बस पटली होऊन झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, असून दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. आष्टी (जि. बीड) तालुक्यातील चिंचपूर जवळ हा अपघात झाला आहे. जखमींनी जामखेड, नगर आणि आष्टीमधील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहेत. मुंबईकडून बीडकडे ही खासगी बस 26 ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता निघाली होती. आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा फाटा येथे बस आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. बस महामार्गावरील पुलाला धडकून रस्त्यावरच पलटी होत दोनशे फुट घसरत गेली. बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दहा ते बारा जण जखमी झाले. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. दोन जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त बसला हटवण्यात आले.
दरम्यान, आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगर येथे पेशंटला घेऊन येत असलेल्या रुग्णवाहिकेला दौलावडगाव येथे अपघात झाला. रुग्णवाहिका व ट्रक यांची धडक झाली. या अपघातात सांगवी पाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के (वय 38), रुग्णवाहिकेचा चाल भरत लोखंडे (रा. धामणगाव) यांच्यासह आणखी दोघे, असा चौघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिकेतील एका जखमीवर उपचार सुरू आहे.