नृत्यागंणा गाैतमी पाटील आणि तिचा कार्यक्रमातील राडा हे जणू सूत्रच झाले आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातील पाेलिस आता परवानगी नाकारू लागले आहेत. सातारा पाेलिसांपाठाेपाठ अहमदनगरमधील पाेलिसांनी नृत्यागंणा गाैतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यानंतर देखील कार्यक्रम घेतल्यास गाैतमी पाटील हिच्यावर देखील कारवाईचा इशारा अहमदनगर पाेलिसांनी दिला आहे. तशी संबंधित आयोजकांना ताेफखाना पाेलिसांनी नाेटीस बजावली आहे.
दरम्यान, या ठिकाणी काेणत्याही स्वरुपाचा कार्यक्रम घेतल्यास किंवा गाैतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम झाल्यास संबंधितांविराेधात आणि गाैतमी पाटील हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ताेफखाना पाेलिसांनी दिला आहे.
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन राेडवर गुरूवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मृत्युजंय युवा प्रतिष्ठानने नृत्यागंणा गाैतमी पाटील हिचा कार्यक्रम आयाेजित केला हाेता. तशी परवानगी घेण्यासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी पाेलिसांकडे अर्ज केला. परंतु बंदाेबस्तावरील ताण आणि अहमदनगर शहरातील अलीकडच्या काळातील परिस्थिती पाहता गाैतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. या कार्यक्रमामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. तशा यापूर्वी घटना घडल्या आहेत, याचा दाखल देत ताेफखाना पाेलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार परवानगी नाकारली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद नाकाडे (रा. गुलमाेहर राेड) आणि उपाध्यक्ष आकिब शेख (रा. गुलमाेहर राेड) यांना पाेलिसांनी प्रतिबंधात्मक नाेटीस बजावण्यात आल्या आहेत. 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला नृत्यांगणा गाैतमी पाटील हिचा पाईपलाईन राेडवरील यशाेदानगर इथं सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आयाेजित करण्याचे नियाेजन हाेते. परंतु सावेडीतील सर्व मंडळाची विसर्जन मिरवणूक यशाेदानगर इथं येते. तिथे माेठी गर्दी हाेते. तिथेच कार्यक्रम हाेणार असल्याने तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे गाैतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.