अहमदनगर ः यंग मेन्स ज्युदो असोसिएशनवतीने 4 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत 8 ते 16 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी फिटनेस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणात यंग मेन्स ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.धनंजय जाधव व सचिव प्रा.संजय धोपावकर यांच्या संकल्पनेतून मैदानात फिटनेस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये ज्युदो, कुस्ती, कुराश, लाठी, काठी, योगा, रोप, मल्लखांब, जिम्नॅस्टिक व घोडेस्वारी खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन यंग मेन्स ज्युदो असोसिएशनचे सचिव प्रा,संजय धोपावकर यांनी केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी गणेश लांडगे 92225566458, भूषण घाटविसावे 7517505031, आदित्य धोपावकर 8446808321 यांच्याशी संपर्क साधावा.