Ahmednagar: सेवाबहुल सहलींची परंपरा राखत आपल्या स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांसह श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस यात्रा कंपनी नेहमीच नवनवीन उपक्रम आपल्या पर्यटक ग्राहकांसाठी राबवत असते. आता या कंपनीतर्फे खास लोकाग्रहास्तव नर्मदा परिक्रमेचे आयोजन भागवताचार्य हरिभक्त परायण जयंत नांदेडकर महाराज यांच्यासमवेत करण्यात आले आहे. परिक्रमेसाठी प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने पर्यटकांची नोंदणीही सुरू झाली आहे, अशी माहिती संचालिका शुभांगी क्षीरसागर यांनी दिली.
12 ते 28 जानेवारी व 11 ते 27 फेब्रुवारीला ही नर्मदा परिक्रमा शास्त्रोक्त पद्धतीने होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील भागवताचार्य हरिभक्त परायण जयंत नांदेडकर महाराज यांच्या मधुर वाणीतून सहभागींना नर्मदा परिक्रमा पुराण ऐकावयास मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे. या परिक्रमेमध्ये शेगांव, ओंकारेश्वर, प्रकाशा, बडवानी, बिमलेश्वर, निलकंठेश्वर, नारेश्वर, गरुडेश्वर, महेश्वर, उज्जैन, नेमावर, भेडाघाट, अमरकंटक, महाराजपूर, होशंगाबाद, ओंकारेश्वर आदि ठिकाणी सहभागी होणार्या भाविकांना जाता येईल. 17 दिवसांची ही यात्रा आहे.
यात्रेसाठी आगाऊ व त्वरित नावनोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे जानेवारी व फेब्रुवारीमध्ये होत असलेल्या नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी भाविकांनी बुकींग करावे, असे आवाहन संयोजक श्यामकांत क्षीरसागर यांनी केले आहे.
30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान 11 मारुती दर्शन तसेच 3 ते 5 जानेवारी दरम्यान अष्टविनायक दर्शन अश्या प्रत्येकी 3 दिवशीय सहलींचेही आयोजन करण्यात आले आहे. 11 मारुती दर्शनमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती दर्शनासह नरसोबावाडी, मोरगांव आदि ठिकाणे भाविकांना पाहता येतील. 3 दिवसांच्या अष्टविनायक यात्रेमध्ये अष्टविनायकासह देहू, आळंदी या ठिकाणी दर्शन घेता येईल, असे दीपा जोशी यांनी सांगितले.
सहलींमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी रेणुका ट्रॅव्हल्स सर्व्हिसेस (शॉप नं. 3, नीलम प्रोव्हिजन स्टोअर्सशेजारी, पोलिस कॉलनी, कुष्ठधाम रोड, डॉ. पानसंबळ हॉस्पिटलमागे, सावेडी, अहमदनगर) मोबाईल क्रमांक 9922240515 व 9405032698 आणि सौ. दिपा जोशी (मो. 8379841261, 9404401699) येथे नाव नोंदवावे, असे श्यामकांत क्षीरसागर यांनी सांगितले.