अहमदनगर ः शारदीय नवरात्र उत्सव काळात राज्यातील लाखो भाविकांनी श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मोहटा देवी चरणी भरभरून दान अर्पण केले. सुमारे 1 कोटी 65 लाख रुपयांचे दाने देवी भक्तांकडून देवीला अर्पण झाले. रोख रक्कम, सोने, चांदीचा यात समावेश आहे. मोहटादेवी गडावरील देवस्थानच्या दानपेट्यामधील दानची मोजमाप नुकताच झाली. धर्मादाय उपायुक्तांचे प्रतिनिधी उमाकांत फड, सराफ काशिन्नाथ शेवाळे आदी उपस्थित हेते.
रोख रकमेत 1 कोटी एक लाख दोन हजार रुपये, देणगी पावतीद्वारे 33 लाख 76 लाख 760 रुपये, कावड, पालखी एकत्रित दोन लाख 20 हजार 625 रुपये, आॅनलाईन पाच लाख 12 हजार 400 रुपये, 16 लाख 33 हजार रुपयांचे 276 ग्रॅम वजनाचे सोने, सहा लाख 84 हजार 600 रुपयांची 9 किलो 125 ग्रॅम वजनाची चांदीचा देणगीमध्ये समावेश आहे. शारदीय नवरात्र उत्सवात देवीच्या लाखो भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे, भरभरून दान देवीच्या चरणी अर्पण केले. देवी नवसाला पावते, अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे.
मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र महोस्तव यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे अध्यक्ष तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, वकील कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, अनुराधा केदार, वकील विक्रम वाडेकर, श्रीराम परताणी, बाळासाहेब दहिफळे, प्रतिभा दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी कार्यरत होते अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.