अहमदनगर : समाजामध्ये सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करीत असताना प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे. माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त पारंपरिक मिरवणुकीतून आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम केले आहे. श्री संत सावता माळी मित्र मंडळाच्या माध्यमातून डीजे मुक्त ढोल ताशाची पारंपारिक आकर्षक मिरवणूक काढून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी पाहून मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे व बोरुडे कुटुंबावरील जनतेचे असलेले प्रेम दिसत आहे. धार्मिकतेतून समाज प्रबोधनाचे काम केले जात आहे नवरात्र उत्सव निमित्त सर्व समाज एकत्र येऊन मोठ्या उसात विविध कार्यक्रम साजरे करत असतात, असे प्रतिपादन अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी केले.
बोरुडे मळा येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्री सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने डीजे मुक्त पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, रील स्टार अक्षता वाल्हेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सुरेखा कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक शामआप्पा नळकांडे, सविता शिंदे, संतोष गेनाप्पा, दगडू मामा पवार, विलास ताठे, संदीप बोरुडे, अश्विनी बोरुडे, हिराताई बोरुडे, प्रदीप बोरुडे, शरद बोरुडे, नंदू बोरुडे, ओंकार बोरुडे, आदीसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
सभापती पुष्पा बोरुडे म्हणाल्या की, श्री सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम साजरे करीत असतात, नवरात्र उत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे, नवरात्र उत्सवानिमित्त उपस्थितांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली, बोरुडे मळ्यातील नवरात्र उत्सव म्हणजे शहरातील भाविकांसाठी एक पर्वणी असते बोरुडे कुटुंबीयांच्या वतीने नवरात्र उसाचा वारसा अखंडितपणे सुरू राहील या माध्यमातून समाजामध्ये आनंददायी व एकोपा निर्माण होईल यावेळी या मिरवणुकीत युगंधर वाद्य पथक नागरिकांचे भाविकांचे आकर्षण ठरले असे त्या म्हणाल्या, यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.