अहमदनगर ः राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) संघटनेच्या वतीने बिनशर्त समायोजन करून समायोजन होईपर्यंत ‘समान काम समान वेतन’, तसेच आरआर लागू करून समुदाय आरोग्य अधिकारी हा वर्ग अधिकृत स्थापन करण्यात यावे. तसेच ग्रेड-पे, नुसार पेमेंट लागू करण्याच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषद समोर लक्षणीय काम बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष डॉ. शैलेश पवार, उपजिल्हाध्यक्ष रेशमा शेख, सूर्यकांत यादव, सचिव अक्षय पठारे, सहसचिव डॉ.दिनेश भोज, कोषा अध्यक्ष सागर गायकवाड, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद गमे आदीसह प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यस्तरीय समायोजन कृती समितीने संघटनेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्व डॉक्टरांनी कोरोना काळामध्ये आपले कर्तव्य चोक पद्धतीने बजावलेले होते ती आठवण आणून देण्यासाठी काही डॉक्टरांनी पी पी किट घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले. तसेच दिवाळीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर दिवाळीनंतर बेमुदत जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..