इलेक्ट्रिक स्कूटर एथर 450S मॉडेलच्या स्कूटरचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, “एथर या इलेक्ट्रिक स्कूटर ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी स्कूटर लॉन्च केलेली आहे. व इतर गाड्या असताना देखील नागरिकांच्या मनात एक इलेक्ट्रिक स्कूटर असली पाहिजे. अशी भावना निर्माण होते. या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे अहमदनगर शहर, जिल्हा व राज्य प्रदूषणमुक्त होईल”.
एथर या नवीन शोरूमचे संचालक रितेश नय्यर म्हणाले, “इलेक्ट्रिक स्कूटर एथर 450S या मॉडेलचे अनावरण करण्यात आले असून ही नागरिकांना योग्य दरात परवडणारी आहे. उत्कृष्ट क्वालिटी व संपूर्ण स्टील चेसीस् असून आयपी-67 रेटेड पाणी व धूळ प्रतिरोधक बॅटरी पाच वर्ष वॉरंटीसोबत असून बॅटरीमध्ये सेल आहेत. बॅटरी न बदलता फक्त कमी दरात सेल बदलून नवीन बॅटरी होणार आहे”. पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना वाहने परवडत नाही. अशावेळी ही इलेक्ट्रिक बाईक स्कूटर नागरिकांना परवडणार असल्याचे सांगितले.
महापालिका स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक दत्ता जाधव, शोरूम चे संचालक रितेश नय्यर, काका शेठ नय्यर, लालूशेठ नय्यर, हितेश ओबेरॉय, सुरेश बनसोडे, सावंत छाब्रा, वीरेंद्र ओबेरॉय, हर्षल भंडारी, अमन वाही, हर्ष ओबेरॉय,मोसिन मिर्झा, इरफान शेख, भूषण ओस्तवाल आदी उपस्थित होते.