Adani group :अदानी समूह आणखी संकटात सापडला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या आराेपानंतर फाेर्ब्स अहवालात गाैतम अदानी यांचे माेठे बंधू विनाेद अदानींबाबत माेठा दावा केला आहे. हिंडेनबर्गने फाेर्ब्सचा अहवाल ट्विट केला आहे. कर्जासाठी अदानी समूहातील प्रवर्तकांची हिस्सेदारी गहाण ठेवल्याचे हा दावा आहे. फाेर्ब्सच्या अहवालानुसार विनाेद अदानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका खासगी कंपनीच्या सिंगापूर युनिटने रशिनय बॅंकेकडून घेतलेल्या कर्जासाठी अदानीच्या प्रवर्तकाचा २४० लाख डाॅलरचा भाग गहाण ठेवला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांनी बाजार मूल्यात सुमारे १२५ डाॅलर अब्ज कमी झाली आहे. विनाेद अदानी यांच्याविषयी फाेर्ब्सने वेगवेगळे दावे केले आहेत. यानुसार विनाेद अदानी हे परदेशी भारतीय आहेत. ते दुबईत राहतात. अदानी समूहाशी संबंधित असल्याने ते मुख्य व्यवसायाशी संबंधित आहे. सिंगापूर आणि जकार्ता येथून व्यवसाय चालवतात. हुरून इंडिया रिच लिस्टनुसार विनाेद अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय असल्याचा दावा केला आहे. विनाेद अदानीकडे असलेल्या सिंगापूर येथील
Pinnacle Trade and Investment Pte Lte कंपनीने २०२० मध्ये रशियाच्या सरकारी मालकीच्या VTB बँकेसोबत कर्ज करार केल्याचाही दावा फाेर्ब्सने केला आहे. एप्रिल २०२१ पर्यंत Pinnacle ने २६३ दशलक्ष डॉलरचे कर्ज घेतले आणि अनामित संबंधित पक्षाला ३५८ दशलक्ष डाॅलर कर्ज दिले. अहवालानुसार त्या वर्षाच्या शेवटी पिनॅकलने कर्जासाठी गॅरेंटर म्हणून दोन गुंतवणूक निधी – Afro Asia Trade & Investments Limited आणि Worldwide Emerging Markets Holding Limited – यांना कर्जासाठी हमीदार म्हणून समोर केले.
