महाराष्ट्रातून सिनेसृष्टीला नितीन देसाई यांच्या मृत्यूने धक्का बसलेला असतानाच दाक्षिणात्या सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समाेर आली आहे. तमिळ अभिनेता माेहन (वय 60) यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला आहे. मदुराईतील तिरुपरकुंडम मंदिराजवळील रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळला आहे. माेहन आर्थिक विवंचनेत हाेते. आर्थिक संकटांचा सामना करत हाेते, अशी माहिती समाेर येत आहे.
माेहन मूळचे सेलम जिल्ह्यातील मेत्तूरचे हाेते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छाेट्या-माेठ्या भूमिका केल्या आहेत. पण ते चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी अलीकडे धडपडत हाेते. काम न मिळाल्याने ते मूळ गावी परतले. आर्थिक परिस्थिती बिघडली हाेती. मेत्तूरमध्ये मेन चॅरियट राेडवर राहत हाेते. स्थानिक ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह 31 जुलैला रस्त्यावर आढळला. यानंतर पाेलिसांनी त्याची माहिती दिली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांकडे दिला जाणार आहे.
सुपरस्टार कमल हसन यांच्याबराेबर माेहन यांनी 1989 मध्ये ‘अपूर्व सगाेधररगल’मध्ये काम केले हाेते. यातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली हाेती. या चित्रपटात त्यांनी कमल हसन यांच्या मित्राची भूमिका साकारली हाेती. याशिवाय त्यांनी ‘नान कडवूल’ या चित्रपटात भूमिका साकारली हाेती.