अभिनेता प्रकाश राज त्यांच्या सडेताेड भाषेमुळे नेहमीच चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर देखील ते थेट किंवा उपरोधात्मक टीका करतात. आता प्रकाश राज त्यांच्या थेट आणि सडेताेड भाषेमुळे अडचणीत आले आहे. त्यांच्याविराेधात कर्नाटकातील बागलकाेट जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रकाश राज यांनी एक ट्विट केले हाेते. त्यामुळे ते वादात अडकले आहे. चांद्रयान-3 मिशनबाबत त्यांनी हे ट्विट केले हाेते. या ट्विटमुळे ते अडचणीत आले असून, त्यांच्याविराेधात तक्रार दाखल झाली आहे. हिंदू संघटनांनी त्यांच्याविराेधात पाेलिसांकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.
प्रकाश राज यांनी काही दिवसापूर्वी ट्विटरवर शर्ट आणि लुंगी घातलेल्या चहा विक्रेत्याची कार्टून इमेज शेअर केली. या इमेजला त्यांनी ब्रेकिंग न्यूज, असे कॅप्शन दिले आहे. चंद्रावरून विक्रम लॅंडरने पाठवलेला पहिला फाेटाे… व्वा… justasking… प्रकाश राज यांच्या या ट्विटनंतर त्यांना चांगलेच ट्राेल करण्यात आले. काहींनी प्रकाश राज यांच्या देशाभिमावर देखील शंका व्यक्त केली.
BREAKING NEWS:-
First picture coming from the Moon by #VikramLander Wowww #justasking pic.twitter.com/RNy7zmSp3G— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023
प्रकाश राज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेषच दिसताे, असे म्हटले आहे. मी आर्मस्ट्राॅंगच्या काळातील विनाेदाचा संदर्भ देत हाेताे. आमच्या केरळ चायवालाबद्दल बाेलत हाेताे. काेणता चायवाला ट्राेलर्सनी पाहिला, जर तुम्हाला विनाेद कळत नसेल, तर हा जाेक तुमच्यासाठीच आहे. प्रकाश राज हे नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते आहेत. बाॅलिवूडबराेबरच साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांची विशेष ओळख आहे.