बहुचर्चित ‘आदिपुरूष’ हा रिलीजच्या अगाेदर चर्चेत हाेता, त्यातील अतिरंजक ‘व्हीएफएक्स’मुळे आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट चर्चेत आलाय तो नकारात्मक चर्चेमुळे! अतिरंजक ‘व्हीएफएक्स’मुळे प्रेक्षकांच्या निराशा, तर निर्मात्याचे ५०० काेटी पाण्यात गेले आहे. अतिरंजक ‘व्हीएफएक्स’मुळे आणि संवादामुळे लाेकांच्या मनातील प्रभू श्रीरामाच्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला आहे. हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या पहिल्या शाेपासून प्रेक्षकांना यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. साेशल मीडियावर हा चित्रपट ट्राेल झाल्याने अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रीती सेनाॅन यांचे सिनेसृष्टीतील पुढील करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेऊ लागले आहेत. कथा, व्हीएफएक्स, पात्रांचे सादरीकरण, वेशभूषा सर्व काही प्रेक्षकांना खटकलं आहे. एकप्रकारे ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचा प्रकार झाला आहे.
चित्रपटांच्या चुकांची सुरूवात हाेते, ती ‘व्हीएफएक्स’पासून. ‘व्हीएफएक्स’मुळे प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा हाेत्या. अत्यंत निकृष्ट दर्जाचे ‘व्हीएफएक्स’ या चित्रपटातून पाहायला मिळाले. याचबराेबर चित्रपटातील वेशभूषा चांगलीच खटकते. सीतमाईची भूमिका साकारणारी क्रीती सेनाॅन हिची वेशभूषेवर कामच झालेले नाही. स्वीवलेस ब्लाऊज, पांढरी साडी, माेकळे साेडलेले केस, मेकअप, संवादातील कमकुवतपणावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे, ती अभिनेता सैफ अली खान याने. ‘व्हीएफएक्स’मुळे रावणाची साेन्याची लंकाच दिसत नाही. रावणाच्या साेन्याच्या लंकेचे सादारीकरण एका काेशळाच्या खाणीप्रमाणे करण्यात आले आहे. रावण जेव्हा सीतेचं अपहरण करताे, त्यावेळी रावणाच्या पुष्पक विमानाऐवजी एक वटवाघूळ सदृश्य प्राणी दाखवण्यात आला आहे. यावर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. रावण विद्ववान हाेता. या विद्ववानाचे सादरीकरण करण्याऐवजी विद्रुपीकरण करण्यात आले आहे. रावण हा अजगरांकडून मसाज करून घेण्याचे दृश्य सर्वाधिक खटकते. सीतेमाई प्रमाणेच रावणाचा लूक, हेअरस्टाईल, देहबाेली, वेशभूषा, पेहराव, विचारसरणी, लंकेश्वर म्हणून त्याच्या डाेक्यावर नसलेले मुकुट आदी गाेष्टी प्रेक्षकांना खटकल्या आहेत. चित्रपटात गृहात दिग्दर्शक असताना, तर त्याला सांगितला, असे पडसाद साेशल मीडियावर उमटत आहेत.
अशाेक वाटीकामध्ये सीतामाईला भेटायला हनुमान जाताे. सीतामाई तिथे भेटते. त्यांच्यासंवाद हा भावनात्मक असताे. ताे दिसत नाही. या सीनच्या वेळी हनुमान नमस्कार करण्याऐवजी छातीवर हात ठेवून मुजरा करताे. सीतामाई यावेळी हनुमानाला चुडामणी ऐवजी स्वतःच्या हातातील बांगडी देते, यावर तर साेशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. म्हणजेच दिग्दर्शकाने प्रेक्षकांमध्ये वाद लावून दिले आहेत.
चित्रपटातील संवादात अनेक ठिकाणी चढउतार आहे. ते संवाद खटकतात. सर्वाधिक संवाद खटकताे, ताे म्हणजे हनुमान, रावण यांच्या ताेडी असलेला काही संवाद. हा संवाद प्रेक्षकांच्या जिव्हारी लागला आहे. टपाेरी गुंडाप्रमाणे हा संवाद आहेत. दाेन विद्वान समाेर आल्यावर भाष्य कसे हाेईल, याकडे दिग्दर्शकाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे.
रामायण ही कथा युनिर्व्हसल आहे. त्यातील बदल समाजावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकतात. ओम राऊत याने ‘आदिपुरूष’मधून तेच केले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाली, तर वावगे ठरणार नाही.