LIC म्युच्युअल फंडाने साेमवारी माेठी घाेषणा करत IDBI म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केले आहे. हे विलीनीकरण 29 जुलैपासून प्रभावी झाले आहे. व्यवस्थापनातील मालमत्ता वाढवण्यासाठी LIC ने हे पाऊल उचलले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून अखेरीस कंपनीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता 18 हजार 400 काेटी रुपये हाेती. LIC ने हा निर्णय उत्पादक ऑफर वाढवण्यासाठी आणि विविधता आणण्यासाठी घेतला आहे.
IDBI म्युच्युअल फंडाचा निधी व्यवस्थापक हा 3 हजार 650 कोटी रुपये होता. याचबराेबर देशातील तसेच देशातील आघाडीचे फंड हाऊस म्हणून उदयास येण्यासाठी व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे LIC कडून सांगण्यात आले.
IDBI म्युच्युअल फंडाचा निधी व्यवस्थापक विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर IDBI MF च्या 20 पैकी दहा याेजना LIC MF मध्ये विलीन हाेतील. उर्वरित दहा याेजना LIC MF द्वारे स्वंतत्रपणे ताब्यात घेतल्या जाणार आहेत. यानंतर LIC ची एकूण याेजना संख्या 38 हजार हाेणार आहे. IDBI MF च्या योजनेत गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांना LIC MF च्या विविध उत्पादनांमध्ये इक्विटी, डेट, हायब्रिड, सोल्यूशन ओरिएंटेड थीम, ETF आणि इंडेक्स फंड यांचा समावेश असणार आहे.
LIC म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी. एस. रामकृष्णन यांनी IDBI MF च्या विलीनीकरणामुळे मिड कॅप, स्मॉल कॅप, गोल्ड फंड, पॅसिव्ह फंड सेगमेंटमध्ये योजना बळकट करण्याचा आमचा उद्देश आहे, असे सांगितले. याचबराेबर या विलीनीकरणामुळे उत्पादनांच्या वाढीमुळे नफा मिळणार आहे. मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील उदयोन्मुख संधींचा लाभ घेण्यास देखील हे आम्हाला मदतशीर ठरेल असे टी. एस. रामकृष्णन यांनी सांगितले.
LIC MF ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. त्याचे प्रायोजक आणि भागधारक हे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, GIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे.