कुत्रा! पाळीव प्राणी. पाळला, तर फॅशन ठरते. स्टेट्स ठरते. पाळीव कुत्र्याला प्रेम लावणाऱ्यांचे व्हिडिओ व्हारयल झालेले पाहताे. पण हे भटक्या कुत्र्यांबाबत हाेत नाही. भटके कुत्र्याला पिटाळले जाते. त्यांना मारले जाते. हे तसे नेहमीच हाेते. असाच एक प्रकार भटक्या कुत्र्याच्या पिल्लासाेबत अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडला आहे. कुत्र्याच्या पिल्लाला लाकडी दांडक्याने पिटाळून लावणे हे एका महिलेच्या चांगलेच भाेवले आहे. वाघ्या फाऊंडेशनने या महिलेविराेधात पाेलिसांकडे धाव घेतल्यानंतर तिने यापुढे काेणत्याही माेकाट कुत्र्याला मारहाण करणार नाही, असा माफीनामा लिहून द्यावा लागला.
काल नगर शहरातील एका प्राणी प्रेमींनी हा व्हिडिओ मला पाठवला आम्ही तात्काळ यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली..
खबरदार प्राण्यांना त्रास द्याल तर… कुणालाही सुट्टी नाही
सुमित संतोष वर्मा
अध्यक्ष , वाघ्या फाऊंडेशन 🚩@peta @MoveTheWorld @NagarPolice pic.twitter.com/1N771GMPln— Sumit Varma (@SumitVarma18) October 2, 2023
काेणताही भटका प्राणी स्वतःहून त्रास देत नाही. मनुष्य मात्र मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचे साेडत नाही. संबंधित महिलेने ज्या कुत्र्याच्या पिल्लाला पिटाळले, ते 15 दिवसांचे हाेते. ते पिल्लू आडाेसा शाेधत हाेते. अस्थेने तेथून बाहेर काढले असते, तर ते निघून गेले असते. परंतु त्या मुक्या जीवाला लाकडी दांडक्याने पिटाळले. वाघ्या फाऊंडेशनने मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविराेधात उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमचा संघर्ष राहणार आहे. परंतु आम्हाला मुक्या प्राण्यांवरून मनुष्यांबराेबर संघर्ष करायचा नाही. आम्हाला मुके प्राणी आणि मनुष्यांमधील ‘सेतू’ व्हायचे आहे. मुक्या प्राण्यांच्या संरक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी वाघ्या फाऊंडेशनबराेबर या!
-सुमित वर्मा,
संस्थापक अध्यक्ष, वाघ्या फाऊंडेशन, अ. नगर
याबाबत माहिती अशी ः सावेडीतील प्रेमदान हडकाे इथं गेल्या रविवारी (ता. 1) हा प्रकार घडला. पाऊस पडून गेला असल्याने वातावरणात गारवा हाेता. कुत्र्याचे एक पिल्लू आडाेसा शाेधत हाेते. ते एका घरासमाेर उभा असलेल्या वाहनाशेजारी जाऊन बसले. भूकेने व्याकूळ असल्याने हे पिल्लू भुंकत हाेते. त्यामुळे घरात असलेली एक महिला बाहेर आली. तिने या पिल्लाला पाहिले. ती या पिल्ला काढून देत हाेते. पण, कुत्र्याचे ते पिल्लू हटत नव्हते. शेवटी त्या महिलेने या कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी माेठे लाकडी दांडके घेतले. कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढून चांगले पिटाळले. ज्यापद्धतीने महिला त्या कुत्र्याच्या पिल्लाला पिटाळत हाेती, त्याचा व्हिडिओ स्थानिकांपैकी काेणीतरी काढला. यानंतर हा व्हिडिओ भटक्या कुत्र्यांच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी लढणाऱ्या वाघ्या फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.
वाघ्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी त्या व्हिडिओची तत्काळ दखल घेतली. व्हिडिओमधील वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर सुमित वर्मा, किर्ती बेल्हेकर, मयुरी बनकर आणि रितेश रानमाळे यांच्यासह ताेफखाना पाेलिसांकडे धाव घेतली. पाेलिसांना व्हिडिओ दाखवत तक्रारी अर्ज सादर करत कारवाईची मागणी केली. यानंतर पाेलिसांनी प्रेमदान हडकाेमध्ये घटनास्थळी आले. तिथे संबंधित महिलेकडे विचारणा केली. महिलेने सुरूवातीला प्राणी प्रेम व्यक्त केले. कुत्र्याच्या पिल्लाला हकलेच नाही. अशी भूमिका घेतली. यानंतर पाेलिसांनी व्हिडिओ दाखवल्यावर महिलेच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. महिलेने माफी मागण्यास सुरूवात केली. कुत्र्याच्या पिल्लाला मारले नसून, ढकलेले आहे, असे म्हणाली. वाघ्या फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर मात्र महिलेने माफीनामा सादर करत काेणत्याही भटक्या कुत्र्याला मारणार नसल्याचे लेखी दिले. यानंतर वाघ्या फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेला ताकीद देत भटक्या कुत्रे आणि प्राण्यांविषयी जनजागृती सहभागी हाेण्याचे आवाहन केले.