‘पुष्पा: द राइज’, हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला हाेता. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर दमदार कामगिरी केली हाेती. कमाईमध्ये 300 काेटीचा टप्पा पार केल हाेता. ‘पुष्पा’चा दुसरा भाग येत आहे. अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणार आहे. ‘पुष्पा दाेन’ने प्रदर्शनापूर्वीच एक नवा विक्र केला आहे.
‘पुष्पा दाेन’च्या सिनेमाच्या पाेस्टरला इन्स्टाग्रामवर सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळणारे पहिले भारतीय चित्रपट पाेस्टर ठरले आहे. ‘पुष्पा’च्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर पाेस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. सात एप्रिलला ‘पुप्षा दाेन’ सिनेमाचे पाेस्टर रिलिज करण्यात आले हाेते. या पाेस्टरमध्ये अल्लू अर्जुन साडी परिधान केलेला दिसत आहे. ‘पुष्पा दाेन’ सिनेमा सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटाचे शुटींग आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये संपणार आहे. ‘पुष्पा दाेन’मध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल, रश्मिका मंदाना, साई पल्लवी हे प्रमुख भूमिकेत असणार आहे.