Nagar Crime News ः ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर चोरून नोणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या टोळीकडून दोन ट्रॅक्टरसह ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख (वय ३०), शकिल नजीर शेख (वय २४), विशाल सुनिल बर्डे (वय २६), अक्षय श्रीराम जमधडे (वय २०, रा. अंबिकानगर, कोल्हार बुद्रुक, ता. राहाता), सोहेल नसीर शेख (वय २०, रा. पिंजारगल्ली बाजारतळ, कोल्हार बुद्रुक, ता. राहाता, आणि विवेक लक्ष्मण शिंदे (वय २६, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्यांची नावे आहे.
किशोर दत्तात्रय धीरडे (रा. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. नगर हे महांकाळवडगांव येथून १९ फेब्रुवारीला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरुन घेऊन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपूर येथे जात असतांना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंचर झाला. ट्रॅक्टर आणि ट्रॉली रोडच्या कडेला त्यांनी उभा करुन थांबला होता. त्यावेळी काळे रंगाचे कारमधून चार अनोळखी व्यक्ती येत हत्याराचा धाक दाखवून किशोर धीरडे याला कारमध्ये बसवून फिर्यादीचा ट्रॅक्टर बळजबरीने चोरुन घेऊन गेला. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय फिर्यादी अरुण सिताराम पवार (रा. निपाणी निमगांव, ता. नेवासा) यांना २२ फेब्रुवारीला नगर हे भानसहिवरे शिवारातून त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जाताना त्यांचे ट्रॅक्टरला कार आडवी लावली. त्यांच्याकडील ट्रॅक्टर चोरुन नेला. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ह दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही सारखीच असल्याने व त्याचे स्वरूप गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाची नियुक्ती करत कारवाई सुरू केली. गुन्हेगारांची माहिती काढली. ही लूट अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख याने त्याच्या साथीदारांमार्फत केल्याची माहिती मिळाली. अल्लाउद्दीन शेख याला पोलीस पथकाने त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये दोघेजण बसलेल होते. त्यांना देखील पोलिसांनी घेरावा घालून ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. मात्र नेवासा येथील राहुल आहेर हा पसार झाला. या गुन्हेगारांकडून एअर पिस्टल, लोखंडी कत्ती, तसेच रोख रक्कम, कार, मोबाईल तसेच आरोपी अल्लाउद्दीन शेख याचे घराचे पाठीमागील काटवनातून दोन चोरीचे ट्रॅक्टर, असा एकुण ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हेगार इकबाल उर्फ सोन सिकंदर शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द नगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खून, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे एकुण १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अल्लाउद्दीन इब्राहिम शेख याचेविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी, अशा प्रकारचे एकुण चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विवेक लक्ष्मण शिंदे याचेविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये दरोडा, घरफोडी, विनयभंग अशा प्रकारचे एकुण तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.