BJP News ः सबका साथ, सबका विकास! या ध्येयाने भाजपच्या माध्यमातून सर्व समाजात कार्य सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजाला भाजपने न्याय देण्याचे काम करुन विकासाच्या प्रवाहात आणले आहे. मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली. येणाऱ्या लोकसभेत मुस्लिम समाजासह अल्पसंख्याक समाज भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे, अशी भावना भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी व्यक्त केली.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने शहरातील पक्ष कार्यालयात अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक प्रदेशाध्यक्ष मुलतानी व उपप्रदेशाध्यक्ष सलीम बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी मुलतानी बोलत होते. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तय्यब बेग यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार शिवाजी कर्डिले व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अल्पसंख्याक मोर्चाची दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सलीम बागवान म्हणाले, भाजपच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला दिशा मिळत आहे. भाजपचे विकासात्मक व्हिजनने अल्पसंख्याक समाज देखील भाजपला जोडला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ प्रमुखांना सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तय्यब बेग यांनी भाजपच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटत असल्याने जिल्ह्यातील मुस्लिम समाज भाजपा जोडला गेला आहे. हा समाज विकासाला साथ देणारा असून, भाजपच्या पाठिशी एकदिलाने उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर करुन, उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष- जावेद इनामदार (श्रीगोंदा), जमीर अत्तार (पाथर्डी), मुसाभाई शेख (शेवगाव), शब्बीर इमानदार (पारनेर), रफिक पटेल (नगर), निसार शेख (राहुरी), रशीद तांबोळी (पाथर्डी), सरचिटणीस- समीर पठाण (पाथर्डी), रशीद सय्यद (नगर), शब्बीर शेख (पारनेर), निसार शेख (श्रीगोंदा), जब्बार शेख (राहुरी), कासम शेख (शेवगाव), चिटणीस- अफसर सय्यद (राहुरी), बाबाभाई शेख (नगर), महिला जिल्हा उपाध्यक्ष- नसीमा शेख (जामखेड), शायरा शेख (श्रीगोंदा), युवक अध्यक्ष- असलम इनामदार (पारनेर), युवक उपाध्यक्ष- समीर शेख (पाथर्डी), सोशल मीडिया प्रमुख- दिलावर पठाण (नगर), कार्यकारणी सदस्य- सनवर खान, इकबाल शेख, अकबर शेख, रफत शेख, मतीन सय्यद (नगर), हबीब शेख (जामखेड).