अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव इथल्या तांबे वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गाेकुळाष्टमी विविध उपक्रमांनी साजरी झाली. तांबे वस्तीवरील संत शिराेमणी सावता महाराज मंदिरातील सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
शाळेचे मुख्याध्यापक देवीदास कचरे यांनी यांनी श्रीकृष्ण जन्म आणि त्याचे महत्त्व विशद केले. देवीदास कचरे म्हणाले, “श्रीकृष्णांचे विविध गुण विद्यार्थी मित्रांनी अंगीकारले तर त्यांच्या आयुष्यात चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. दहीहंडीच्या माध्यमातून ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, अशी सुंदर शिकवण मुलांच्या मनी उतरवली”.
तंत्रस्नेही शिक्षक शैलेश खणकर यांनी कार्यक्रमाचे सुंदर, नियोजन केले. ‘हंडी फोड’ स्पर्धा झाली. यात शिवम मुंगसे या विद्यार्थ्यांने दहिहंडी फोडली. ग्रामस्थ आणि शाळेतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. सर्व सावता तरुण मंडळाच्या सहकार्याने यशस्वी केले. यावेळी पालकांनी, ग्रामस्थांनी या बालगोपाळांना मिष्टान्न भोजन दिले. यावेळी विविध सजावट व रांगोळ्यांनी परिसर सजला होता. असंख्य पालकांनी या सुंदर सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला. परिसरात या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.
निवृत्ती तांबे, गणेश तांबे, योगेश तांबे, गोरख तांबे, भाऊसाहेब तांबे, कारभारी तांबे, मच्छिंद्र तांबे, अमोल तांबे, उध्दव औटी, अशोक औटी, जनार्दन तांबे, कैलास मुंगसे, शुभम तांबे, शरद मुंगसे, राजू मुटकुळे, अशोक तांबे, येणूबाई तांबे, अविष्कार तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब तांबे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.