Ahmednagar Police ः नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. पतीचे दुसर्या एका मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाचा जाब विचारला म्हणून विवाहितेला सासरच्या लोकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सफिया सोहेल शेख (वय २९, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) विवाहित युवतीने फिर्याद दिली.
सफिया शेख हिचा विवाह २४ डिसेंबर २०२२ सोयल नाजर शेख (रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे) याच्य बरोबर झाला होता. सासरच्या लोकांनी सफिया हिला सुरुवातीला दोन ते तिन महिने चांगले नांदविले. त्यानंतर काही दिवसानी सफिया हिचा पती सोहेल याची नोकरी गेल्याने सफिया हिने नोकरी करुन पैसा कमवावे. या कारणावरून सासरचे लोक तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करू लागले. नवीन रिक्षा घेण्यासाठी सफिया हिने तिच्या माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. यासाठी तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून छळ करू लागले.
दरम्यान सफिया हिने एक दिवस तिचा पती सोहेल याचा मोबाईल पाहिला. मोबाईलमध्ये एका मुलीबरोबर प्रेम संबंधाचे मॅसेज टाईप करुन एकमेकांना मजकूर पाठवलेले दिसले. त्यावेळी सफिया हिने पतीला जाब विचारला असता त्याने सफिया हिला तिच्या पतीने व इतर लोकांनी लाथाबुक्क्ंयानी मारहाण केली. सासरच्या त्रासाला कंटाळून सफिया सोहेल शेख हिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पती सोहेल नाजर शेख, नाजर आब्दुल गणी शेख, शहीनाज नाजर शेख, नुरजहाँ नाजर शेख (रा. कोंढवा खुर्द, जि. पुणे), तसेच रहिसा आल्लाउद्दीन शेख, वशिम सय्यद, दिलशाद अमीर हमजा सय्यद, सिरीन वशिम सय्यद (रा. येरवडा, पुणे) या आठ जणांवर शारिरीक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.