Child Sexual Abuse Prevention Act ः गावात जत्रा सुरू असताना घरी पिण्याचे पाणी भरण्यासाठी आई आणि मुलगी जात असताना गावातील काही टवाळखोरांनी मुलीचा हात पकडून तिची छेड काढली. वडिलांनी याचा टवाळखोरांना समज दिली. मात्र टवाळखोरांनी आणखी जमाव जमवून पीडित मुलीच्या वडिलांना दगडाने जबर मारहाण केली. मुलीचे वडील यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरमधील असलेल्या गावची यात्रा गुरूवारी होती. पीडितेचे संपूर्ण कुटुंब गावात यात्रा महोत्सवात सहभागी झाले होते. दुपारी चार वाजेदरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आजी पिण्याचे पाणी भरण्यासाठी घरी निघून आले. मात्र काही वेळात एकाचा फोन आला आणि तुमच्या मुलीची रस्त्यावर काही टावळखोर मुलांनी छेड काढली. यातून वाद वाढले आहेत. वडिलांनी यानंतर घटनास्थळी धाव घेतली. मुलगी घरी जाताना दुचाकीवरून आलेले मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन आणि आदिनाथ अशोक वामन यांनी मुलीचा रस्ता अडवून तिचा हात पकडला. गैरवर्तन करत तिची छेड काढल्याची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना कळाली.
वरील तिघांना आणि योगेश सखाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन यांना याचा जाब पीडित मुलीच्या वडिलांना विचारला. यावर पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. योगेश उगले याने चाकू काढून पीडित मुलीच्या वडिलांवर हल्ला केला. यावेळी जमलेल्या लोकांनी टावळखोरांपैकी एकाला काठीने च ोप दिला. यानंतर वादही मिटला आणि पीडितेचे वडील घरी निघून गेले.
दरम्यान, सायंकाळी सव्वा सहा वाजता घरी असताना सुमनबाई सखाराम उगले हिने पीडित मुलीच्या वडिलांना फोन केला. “तू तुझे घराच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या माळरानावर ये, आपण चर्चा करून भांडण मिटवून घेऊ”, असा हा निरोप होता. पीडित मुलीचे वडील आणि गावातील काही लोक त्या ठिकाणी गेले. यावेळी त्या ठिकाणी सुमनबाई उगले व योगेश उगले हजर होते. या ठिकाणी चर्चा चालू असताना किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी सुमनबाई उगले हिने कोणालातरी फोन करून काही लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर मोठा जमाव जमला. जमलेल्यांनी पीडित मुलीच्या वडिलांवर आणि नातेवाईकांवर दगडफेक करत निघून गेले. पीडिताचे नातेवाईक घराजवळ आले असता पाठीमागून आलेल्या लोकांपैकी तुकाराम लक्ष्मण कारंडे (रा. दरेवाडी ता संगमनेर) आणि योगेश सखाराम उगले (रा. शेंडेवाडी ता संगमनेर) यांनी त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी गजाने व कुळवाच्या लोखंडी फासणे डोक्यावर, कपाळावर, हातावर, पाठीवर, मारल्याने पीडित मुलीचे वडील गंभीर जखमी झाले.
मुलीची आई पतीला वाचवण्यासाठी पुढे गेली असताना योगेश सखाराम उगले, तुकाराम कारंडे यांनी त्यांच्या हातातील दगडाने व गजाने मारून तिलाही जखमी केले. यावेळी योगेश उगले याने पीडित मुलीच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि वीस हजार रुपये असलेले पैशाचे पाकीट बळजबरीने काढून घेतले. जखमी अवस्थेत असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांना परिसरातीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घारगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन, योगेश सखाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन, सुमनबाई सखाराम उगले, अशोक लहानू वामन, पप्पू अशोक वामन, संदेश वसंत वामन, गणेश जयवंत वामन, सार्थक बाळू वामन, प्रणव शिवाजी वामन, दीपक शंकर दुबे, पप्पू छबु काळे, रामचंद्र साहेबराव काळे, वसंत अनाजी वामन, शिवाजी अनाजी वामन, जयवंत अनाजी वामन, लहानु नानाभाऊ वामन, अनाजी नानाभाऊ वामन, बाबू शंकर दुबे, अमित अशोक वामन, राहुल कारंडे, (सर्व रा. शेंडेवाडी, ता संगमनेर), बबलू बाळासाहेब शेंडगे (रा. बिरेवाडी, ता संगमनेर), सचिन गजानन चितळकर (रा. साकुर, ता. संगमनेर) या 26 जणांवर पोक्सोसह इतर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.