Swarsamragji Lata Mangeshkar News ः “आपल्या सुरांनी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या हिंदी गीतांचा कार्यक्रम नगरमध्ये आयोजित केला याचा आनंद होत आहे. गुरु माऊली संगीत विद्यालयाचे हे दुसरे पर्व असून यापूर्वीच्या संगीत मैफिलीला नगरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे स्वरसम्राज्ञी लता दीदी स्वर रसिकांच्या मनावर अनंत काळापर्यंत राज्य करत करतील यात शंका नाही”, असे प्रतिपादन श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाचे चंद्रकांत पंडित यांनी केले.
श्री गुरूमाऊली संगीत विद्यालय अहमदनगर आयोजित स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्ताने सावेडीत “मेरी आवाजही पहचान है” या कार्यक्रमाचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या झाले. या कार्यक्रमात नगरमधील गायक आणि वादक कलाकार सहभागी होते. त्यात वर्षा पंडित, माधुरी गुर्जर, रूपाली कुलकर्णी, माधवी ऋषी, निवेदिता खळीकर, निलेश खळीकर, गौरी बिडकर, अनघा रासने, अभय कांकरिया, आदेश चव्हाण, आनंद ऋषी, योगेश अनारसे कलाकारांनी गाणी सादर केली.
लतादीदींच्या ‘दाता तू गणपती गजानन’ या गाण्यावर विद्यालयाच्या नृत्य विभागाच्या दर्शना दंडवते, सृष्टी गंधे, चैत्राली क्षीरसागर , गौरी साठ्ये, अनन्या तुंगार , मुग्धा देवचके, पूर्वा म्याना या विद्यार्थिनींनी नृत्य केले. त्यानंतर ओ सजना , वो भुली दासतां , रुक जा रात ठहर जा , शिशा हो या दिल, रस्मे उल्फत, ए दिले नादां , एक शहनशाह, किसी राह में किसी मोड पर, सावन का महिना ,ये कहा आ गये हम , परदेसिया ना जिया लागेना, युं हसरतोंके दाग, उपर खुदा, छोटी सी उमर, तेरा जाना , रहे ना रहे हम ह्या गाण्यांनी वातावरण लतामय झाले होते .खास या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेल्या निलेश खळीकर व निवेदिता खळीकर यांनी गायलेल्या बाजे रे मुरलिया या गाण्याने रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. मेरी आवाजही पहचान है या कार्यक्रमाच्या शीर्षक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गायकांना वाद्यांची साथसंगत अजित गुंदेचा, (तबला व ढोलक) दिलावर शेख (कीबोर्ड), सत्यजित सराफ (कीबोर्ड), गौतम गुजर (ऑक्टोपॅड ) यांची होती.
श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित यांनी कार्यक्रमाचो संयोजन केले. नगरमधील तृप्ती विवेक वाडेकर , संजय हिंगणें ,अशोक डोळसे, इत्यादी मान्यवरांच्या कार्याचा उल्लेख करून आनंदजी देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमाला विशेष सहकार्य अशोक गांधी जरीवाला, हार्दिक शाह, श्री डिस्ट्रिब्युटरचे, नीलेश पल्लोड, ग्लोबल हेल्थ केअर सेंटर राहुरीचे डॉ.सागर कड तसेच पद्माकर वांजळे हे होते. दिनकर घोडके, मकरंद खेर, हेमंत मिरिकर, ज्ञानेश कुलकर्णी, पी.डी.कुलकर्णी, अशोक गुर्जर, कृष्णकांत गांधी, अजय गांधी, डॉ.राजेंद्र कोठारी, रवींद्र बारसकर, अशोक गायकवाड, डॉ.रुपाली जंगले, शुभा बोगावत, दिनकर घोडके, सुहास मुळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन जेष्ठ निवेदक आनंद देशमुख यांनी केले. दिनेश मंजरतकर यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर लतादीदींच्या प्रतिमेची सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती. आनंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.