Auditor convention in town ः “जगद्गुरु तुकाराम महाराज जन्मापासून ते मरेपर्यंतचे बजेट सांगून गेले आहेत. प्रत्येकासाठी जीवनाचे ऑडीट हे महत्त्वाचेच आहे. आवक, जावक व शिल्लकीचा ताळमेळ साधण्यासाठी प्रत्येकाने सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. जीवनाचे व व्यवहाराचे हे दोन्ही बजेट आपल्या हातात असतात. त्यामुळे लेखापरीक्षकांनी आपल्या स्वतःच्या जीवनाचे, संस्थांचे व देशाचेही बजेट चांगले करावे. आपल्या ऋषीमुनींनी वसुधैव कुटुंबकम् चा कानमंत्र दिला आहे. म्हणून केवळ मानवतेचा विचार करून लेखापरीक्षकांनी आपल्याला जीवनाचा ताळेबंद चांगला करण्याबरोबरच देशाचा ही ताळेबंद चांगला करावा”, असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत हभप भास्करगिरी महाराज यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांचे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन देवगड देवस्थानचे महंत हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. राज्याचे सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर, सेवानिवृत्त अप्पर निबंधक एस. बी. पाटील, जिल्ह्याचे उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, पुण्याचे विशेष लेखापरीक्षक सदानंद वुईक, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे राज्याध्यक्ष रामदास शिर्के, सचिव उमेश देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, विश्वस्त बाळासाहेब वाघ, श्रीकांत चौगुले व संजय घोलप आदींसह पूर्ण राज्यातून विक्रमी ७०० लेखापरीक्षक उपस्थित होते. उपस्थित लेखापरीक्षकांनी आपल्या कामाशी कोणतीही तडजोड न करता प्रामाणिकपणे लेखापरीक्षण करून सहकार समृद्ध करण्याची सामूहिक शपथ घेतली
उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते म्हणाले, “लेखापरीक्षक हे सहकारी संस्थांचे सेवक व आत्मा आहेत. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पारदर्शीपणे होणे आवश्यक आहे. यासाठी लेखापरीक्षकांनी पतसंस्था, सहकारी संस्थांमधील चुकीच्या अप्रिय घटनांचा वेळीच बंदोबस्त करावा. कायद्याने तुम्हाला भरपूर अधिकार दिलेले आहेत. त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा”. उपनिबंधक गणेश यांनी ९७ व्या घटना दुरुस्तीने लेखापरीक्षकांना स्वायत्त देण्यात आली आहे. प्रमाणित व सनदी लेखापरीक्षकांनी काळजीपूर्वक लेखापरीक्षण करावे. वित्तीय संस्था बऱ्याचदा वाढीव अभासी व्याज दाखवतात. हे खूप धोकादायक असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. लेखापरीक्षकांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी असे अधिवेशन उपयुक्त आहे, असे सांगितले.
राज्याचे सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर यांनी सहकारी चळवळ समृद्ध व वाढण्यासाठी तुमची जबाबदारी व काम खूप महत्त्वाचे आहे. लेखापरीक्षकांच्या कायद्यात अद्याप कोणताही बदल झाला नाही हे तुम्ही करत असलेल्या कामाचेच यश म्हणावे लागेल. चुकीचे काम निदर्शनास आणून पारदर्शी कारभारासाठी आग्रही भूमिका घ्यावी. संघटनेने लेखापरीक्षकांचे प्रलंबित प्रश्न वेळोवेळी माझ्याकडे मांडली आहेत. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. रामदास शिर्के यांनी ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने लेखापरीक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला जात आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आपले बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत. असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाने हे अधिवेशन यशस्वी झाले आहे, असे सांगितले.
दोन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय अधिवेशनात जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या लेखापरीक्षकांना पुरस्कार देण्यात आले. अधिवेशनाचा समारोप देवगड देवास्थाचे उत्तराधिकारी हभप प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला. अधिवेशनाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव उमेश देवकर यांनी केले.अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे नगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग लांडगे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, उपाध्यक्ष दत्तात्रय बोंबले व भाऊसाहेब वेताळ, सचिव राणी देवकर, सहसचिव विष्णू नेहे, विश्वस्त अतुल शुक्ल, परशुराम कोतकर तसेच छत्रपती संभाजीनगरचे संजय वाणी, गणेश वर्मा, हनुमंत हाके, शांतीलाल जाधव, गोपाळ राठोड, पुष्कराज वाटपाडे, गिरीश खिस्ती आदी पदाधिकारींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दत्तात्रय पवार व श्रीकांत चौगुले यांनी केले. संजय घोलप यांनी आभार मानले.