Old Pension ः महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची वोट फॉर ओपीएस संकल्प यात्रा नगर शहरांमध्ये दाखल झाली. या संकल्प यात्रेचे स्टेट बँक चौकामध्ये नगर जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी संघटनेने स्वागत केले. आम्हाला सरकारने जाहीर केलेली जीपीएस पेन्शन योजना मान्य नाही. आम्हाला जशीच्या तशी हवी आहे. जुनी पेन्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा अग्निकुंड असाच धगधगत राहणार असल्याचा निर्धार या संकल्प यात्रेतून करण्यात आला. या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी मुंबईला सर्व कर्मचाऱ्यांनी यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, सचिव गोविंद उगले, राज्य सल्लागार सुनील दुधे, राज्य सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ आदी उपस्थित होते.
नगर शहरातील स्टेट बँक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यात संकल्पयात्रेमध्ये शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, राजकुमार साळवे , जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अभय गट,संजय कडूस, सुरेश निवडुंगे, अर्जुन शिरसाठ, रामेश्वर चोपडे ,निर्गुणा बांगर-कापसे, सरस्वती घुले , संदीप मोटे पाटील, बाळासाहेब कापसे, प्रकाश नांगरे, सचिन नाबगे, प्रदीप दळवी, गहिनीनाथ पिंपळे, अभय गट , जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना गाढवे, शरद कोतकर, संदीप ठाणगे, प्रविण झावरे, अरविंद थोरात, संदिप कवडे हे सहभागी झाले होते.
मार्केटयार्ड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्याच ठिकाणी सभा घेण्यात आली. अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस तथा शिक्षक बॅंकेचे संचालक कल्याण लवांडे अध्यक्षस्थानी हे होते. सभेसाठी शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, रावसाहेब रोहोकले, आबासाहेब जगताप, संजय कळमकर, प्रवीण ठुबे, बाळासाहेब सालके आदी उपस्थित होते.
राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी कोणत्याही परिस्थितीत शासनाची नवीन GPS योजना स्वीकारली जाणार नाही व सर्व कर्मचारी 1982 च्या जुन्या पेन्शन योजनेवरच ठाम असून पेन्शन मिळेपर्यंत संघर्ष अटळ असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे शिक्षक संघाचे संभाजी तात्या थोरात यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन योजना मिळत नाही, तोपर्यंत शिक्षक संघ जुनी पेन्शन संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी होईल अशी ग्वाही दिली.
शिक्षक नेते प्रवीण झावरे, सचिन नाबगे, देवेंद्र आंबेटकर, राज चव्हाण, निलेश राजवळ, अरविंद थोरात, राज कदम, शिवनाथ भुजबळ, शिवाजी आव्हाड, केशव कोल्हे, सतीश पठारे, राजेंद्र खरमाळे , चंद्रकांत गट,अशोक जाधव,विजय शिंदे,संतोष ढोले,राहुल लोखंडे,प्रवीण खाडे,विकास खेबडे,नितीन दळवी,संदीप खाडे,शरद गावडे जुनी पेन्शन संघटनेची जिल्हाकार्यकरणी व सर्व तालुकाध्यक्ष तालुका कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले.