अहमदनगर : विजयादशमीच्या (दसरा) मुहुर्तावर नगर शहरात चारचाकी वाहन खरेदीने सीमोल्लंघन झाले. चारचाकी वाहन खरेदीला चांगलीच गर्दी दिसून आली. अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण केले. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
सनई-चौघड्यांच्या सुरात ग्राहकांचे शोरुममध्ये स्वागत करण्यात आले. दिवसभरात तब्बल 22 कारचे वितरण करण्यात आले. टोयोटाच्या वाहनांना मागणी असल्याने ग्राहकांना कारसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. गाडीची विधीवत पुजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते नवीन चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, मॅनेजर दिपक जोशी, टीम लीडर प्रविण जोशी, रविंद्र थोरात, सेल्स ऑफिसर अविनाश लाळगे, संदीप काकडे, संकेत अवघडे, सुरेश खेतमाळीस, सुयोग सदाफळे आदींसह ग्राहक वर्ग मोठ्या सख्येने उपस्थित होते.
कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देऊन कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व योग्य किंमत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांकडे ग्राहकांचा कळ अधिक आहे. तसेच सुसज्ज शोरुम, वर्कशॉपच्या माध्यमातून तत्पर सेवा, कुशल कामगार वर्ग यामुळे ग्राहक टोयोटाला पसंती देत आहे. इन्होवा, फॉर्च्युनर, ग्लांझा, अर्बन क्रुझर हाईराइडर, रुमियन या टोयोटाच्या वाहनांना मागणी आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदीत दुपटीने वाढ झाली असून, दुचाकी पेक्षा चारचाकीकडे ग्राहकांचा कळ अधिक असल्याची माहिती शोरुमचे अनिश आहुजा यांनी दिली. शोरुममध्ये वाहनांच्या खरेदी व बुकिंगवर आकर्षक सवलत उपलब्ध करुन देण्यात आली असून, ग्राहकांना शोरुमला भेट देण्याचे आवाहन जनक आहुजा यांनी केले आहे.