अहमदनगर ः अहमदनगर महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या वतीने ‘टेक फन 2023’ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील व इतर महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. या टेक-फन 2023 चे उद्घाटन “महाविद्यालय प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे काैतुक केले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस म्हणाले, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे, जेणेकरून मोबाईल मुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान थांबेल आणि स्पर्धेंकडे विद्यार्थी आकर्षित होऊन त्यांच्यातील कला हे समाजासमोर सादर करतील, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आपोआपच विकास होईल. आणि त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
या ‘टेक-फन 20३३’ मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ब्लाइंड कोडिंग, क्वीझ आणि पोस्टर स्पर्धा आयोजित “करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या सत्रात वादविवाद आणि मॉडेल प्रेझेंटेशन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन कॉम्प्युटर सायन्सच्या विभागाचे प्रमुख डॉ. रझाक सय्यद तसेच कॉम्प्युटर विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले होते.
उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले होते. कार्यक्रमात डिव्हाईन ग्रेस या शाळेच्या विदयार्थ्यांनी भेंट दिली व पालक तसेच इतर महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून अपूर्णा धर्माधिकारी, नम्रता देठे, आखिनी चंगेडिया, काळे वर्षा यांनी काम पाहिले. यात उत्कृष्ट कनिष्ठ महाविद्यालय पुरस्कार’ ‘अहमदनगर महाविद्यालयाने’ मिळवला. तसेच सर्वोकृष्ट पदवी पूर्व महाविद्यालय पुरस्कार “सी. डी. जैन महाविद्यालय’ श्रीरामपूरने पटकवला.
या कार्यक्रमास अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे बार्नबस, उपप्राचार्य दिलीपकुमार भालसिंग, नोवेल पारगे, प्रबंधक पीटर चक्रनारायण यांचे मार्गदर्शन लाभले.