अहमदनगर शहरामध्ये पटवर्धन चौक आनंदी बाजार येथील गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्टच्या तुळजाभवानी देवी मंदिरात उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठनेते वंसत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा त्यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीची महापूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील भाविक उपस्थित होते.
वसंत लोढा म्हणाले, “या परिसरात असलेले हे तुळजाभवानी देवीचे मंदिर जुने आहे. छोटे असलेल्या या मंदिराचा काही वर्षांपूर्वी लोक सहभागातून जीर्णोद्धार केला आहे. तेव्हापासून येथे नवरात्र महोत्सव उत्साही वातावरणात व विविध उपक्रमांनी साजरा केला जातो”. नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची पूजा करताना प्रार्थना केली आहे की, आमच्या नगर शहराची झालेली बकाल अवस्था लवकरच संपुष्टात येवो. नगर शहर सर्व दृष्टीकोनातून पूर्ण राज्यात एक आघाडीचे शहर बनावे अशी प्रार्थना देवीच्या चरणी करून साकडे घातले आहेत.
यावेळी संजय वल्लाकट्टी, मनीष लोढा, संदीप शिंदे, सागर शिंदे, रवी चवंडके, राजाभाऊ शिंदे, सुरज नामदे, सचिन शिंदे, जयेश शिंदे, साई शिंदे, प्रज्वल नल्ला, सचिन चवंडके आदींसह महिला उपस्थित होते.