अहमदनगर (Ahmednagar) काॅलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना ईजीएम इंडियातर्फे ‘उत्कृष्ट एज्युकेशन लीडरशिप’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने सत्कार सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे मुख्य समन्वयक डॉ. रझाक सय्यद, उपप्राचार्य नोएल पारगे, विनीत गायकवाड, प्रबंधक पिटर चक्रनारायण, प्रा.अभिजित कुलकर्णी, आर. पी. देशमुख, सुरेश घुले, भागवत परकाल आदी उपस्थित होते.
डाॅ. सय्यद रझाक म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्रात अविरत 30 पेक्षा जास्त वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने प्राचार्य डॉ. बार्नबस यांना या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्राचार्य डाॅ. बार्नबस यांना आजवर 78 पुरस्कार प्राप्त झाले असून हा त्यांचा 79 वा पुरस्कार आहे”. हिवाळे आणि बार्नबस घराण्याची सुवर्ण परंपरेचा वारसा संभाळत आजपर्यंत अनेक शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पनांना त्यांनी मूर्त रूप दिल्याचेही सय्यद रझाक यांनी म्हटले.
प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होत असतो. चांगले कार्य करत असताना हजारो हातांची आपल्याला मदत मिळते. त्या मदतीमुळेच आपण नवनवीन यशस्वी कार्य करू शकतो. महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी केलेले प्रयत्न व महाविद्यालयाचे नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळेच मला विविध क्षेत्रांमध्ये सन्मान मिळत आहे, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. बार्नबस यांच्यावतीने डाॅ. सय्यद रझाक यांनी मुंबई इथं कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.