ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विट) खात्यावरून टीका केली आहे. अण्णा हजारे यांचा फाेटाे ‘एक्स’वर टाकून ‘ह्या माणसानी ह्या देशाचे वाटाेळे केले. टाेपी घातली म्हणजे कुणी गांधी हाेत नाही’, असे त्यावर लिहिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेवर अनेक युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या गेल्या आहेत. एका युजर्सने प्रतिक्रिया देताना अण्णांना म्हटले आहे की, ‘समाधिस्त झालेल्या अण्णांना विनंती आहे, भाजपने देशभर जाे धुमाकूळ चालवला आहे, ताे तरी बघायला जागे व्हाय. उपाेषण वैगेरे नकाे, निदान साधी सुधी टीका तरी कराल? तुमच्या साेयीस्कर आणि संधीसाधू गांधीवादाची इतिहास नक्की दखल घेईल’! एका युजर्सने म्हटले आहे की, ‘ह्यांच्यामुळेच अरविंद केजरीवाल नावाची अराजकता ह्या देशात पसरली! त्या नागाेबाला दूध देण्याचं काम आता तुम्ही करत आहात’! एका युजर्सने प्रतिक्रिया देताना ‘बीजेपीचा पाेपट’ असे म्हटले आहे.
काही युजर्सने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका देखील केली आहे. ‘जनाची नाही, तर मनाची तरी पाहिजे हाेती. एका वयस्कर व्यक्तीबद्दल बाेलताना लाज वाटायला पाहिजे’, असेही म्हटले आहे. ‘आव्हाड यांना गांधींचा फाेटे असलेला फाेटाे दाखवा फक्त, त्यांनी सगळ्यांना टाेपी घातली आहे’, असेही युजर्सने म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी हे सकाळी एक्सवर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून एकही आंदाेलन केलेले नाही. भ्रष्टाचाराविराेधात आणि राज्यातील अस्थिरतेवर अण्णांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. अण्णांच्या या भूमिकेवर सातत्याने टीका हाेत आहे. भाजप सरकारमुळेच अण्णा गप्प आहेत, असा आराेप हाेत आहे.
अण्णा हजारे यांनी केंद्रात काॅंग्रेसची सत्ता असताना आणि मनमाेहन सिंग पंतप्रधान असताना भ्रष्टाचाराविराेधात देशभरात जनआंदाेलन उभारले हाेते. ‘मैं अण्णा हू’, घाेषणेखाली संपूर्ण देश या आंदाेलनामुळे ढवळून निघालं हाेतं. या आंदाेलनानंतर अण्णांनी गेल्या नऊ वर्षात एकही आंदाेलन केलेलं नाही. त्यामुळे अण्णांच्या माैनावर विराेधक आक्षेप घेत आहेत. यात जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांवर केलेल्या टीकेवर अहमदनगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.