दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीची 51 वा वर्धापनदिन उद्या 2 ऑक्टाेबरला साजरा हाेत आहे. यानिमित्ताने दूरदर्शनवर नवीन चार कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम विभागप्रमुख संदीप सूद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली.
नवीन सुरू हाेत असलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘जागाे ग्राहक’, ‘गाेष्टी ज्ञानाच्या’, ‘कथा सईची’ आणि ‘एक विज्ञान’, यांचा समावेश आहे. काेराेना काळामध्ये बंद करण्यात आलेला ‘क्रीडांगण’ आणि ‘एक सिंधी’, कार्यक्रम यासह काही जुने कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची देखीलमाहिती विभागप्रमुख संदीप सूद यांनी दिली.
सईची कथा या कार्यक्रमातून पुन्हा आपल्या मित्र मंडळीच्या सहवासात, त्यांच्या साेबतीने परत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आनंद, चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी व्यक्त केला. दूरदर्शनवरील नवीन कार्यक्रमांचा प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. पत्रसूचना कार्यालयाचे अधिकारी महेश अय्यंगार, ‘एफटीआयआय’चे अधिकारी मिलिंद दामले उपस्थित हाेते.