अहमदनगरचे उद्योजक विराज विवेक भंडारे यांच्या ‘ला बेला’ या प्रोसेस चीज कंपनीला न्यूयॉर्क अमेरिका इथल्या एपिक्युअर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘एपिक्युअर फाईन फूड अवॉर्ड 2023’, हा अंतराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. न्यूयॉर्क इथल्या एपिक्युअर फाईन फूड संस्थेने सर्वोत्कृष्ट प्रक्रिया केलेल्या डेअरी उत्पादन श्रेणीमध्ये ‘ला बेला’ चीजची निवड करून हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे.
18 डिसेंबरला अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.विराज भंडारे म्हणाले, “‘ला बेला’ कंपनीचे उत्पादन रांजणगाव येथून 2020 पासून होत आहे. सुरूवातीला छोट्या स्वरुपात स्वयंपाक घरातून सुरू झालेला हा प्रवास आता रोज दहा हजार किलो उत्पादनापर्यंत जाऊन पोहोचला आहे. इथं मॉझरेला चीज, प्रोसेस चीज, क्रीम चीज आणि इतर सर्व प्रकारचे चीज बनवण्यात येतात”. महाराष्ट्रामधील दुग्ध व्यवसायाला या कंपनीने एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. अमेरिकेच्या या प्रतिष्ठित पुरस्काराने ‘ला बेला’ चीजचा सर्वोत्कृष्ट दर्जा, चव व गुणवत्ता टिकून असल्याचे सिद्ध झाले आहे, असे विराज भंडारे म्हणाले.
या पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रॉडक्ट्स जगभरातील नावाजलेले शेफ आणि व्यावसायिकांकडून पारखले जाते. देशासह व बाहेरील देशातील नागरिकांच्या पसंतीस हे चीज उतरले आहे.