2000 हजार रुपयांच्या नाेटा बदलण्यासाठी आज 30 सप्टेंबर शेवटची मुदत आहे. अद्यापपर्यंत तब्बल 24 हजार काेटी रुपयांच्या नाेटा बॅंकिंग व्यवस्थेत परत आल्या नसल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत 2000 हजार रुपयांच्या नाेटा परत करण्यासाठी 31 ऑक्टाेबरपर्यंत वाढविण्याचा विचार रिझर्व्ह बॅंक (RBI) करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान 2000 हजार रुपयांच्या नाेटा काळ्या बाजारात झटपट बदलून मिळतात, असे चित्र आहे.
रिझर्व्ह बॅंकेने 19 मे राेजी 2000 हजार रुपये मूल्याच्या नाेटा व्यवहारातून माघारी घेण्याची घाेषणा केली. बॅंकेच्या म्हणण्यानुसार 31 मार्चपर्यंत 3 लाख 62 हजारकाेटी रुपये किंमतीच्या 2000 हजाराच्या नाेटा चलनात हाेत्या. 19 मेपर्यंत त्याचे प्रमाण 3.56 लाख काेटी, तर 1 सप्टेंबरच्या आकेडावारीनुसार 3.32 लाख काेटींच्या 2000 हजारच्या नाेटा बॅंकिंग प्रणालीत परत आल्या हाेत्या. म्हणजेच सप्टेंबरपर्यंत एकूण 93 टक्के नाेटा बॅंकिंग व्यवस्थेत दाखल झाल्या आहेत. मात्र त्यानंतर सुमारे 24 हजार काेटी रुपयांच्या नाेटा बाहेर आहेत. म्हणजे, बाजारात आहे. रिझर्व्ह बॅंक 2000 हजार रुपयाच्या 100 टक्के नाेटा बॅंकिंग व्यवस्थेत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे नाेटा जमा करण्यासाठी मुदत वाढवली जाऊ शकते.
2000 हजार रुपयांच्या नाेटा बॅंकेत जमा करण्याची विशिष्ट प्रणाली आहे. त्यासाठी बॅंकेत किंवा टपाल कार्यालयात जाऊन एक अर्ज भरावा लागताे. मग रांगेत उभे राहून एकावेळी फक्त 20 हजारांपर्यंतच्या म्हणजे 10 नाेटा परत केल्या जाऊ शकतात. ही सर्व प्रक्रिया किचकट आहे.