नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप म्हटला, की माेठी जीवित आणि मालमत्तेचे माेठे नुकसान हाेते. भूकंप ही अशी आपत्ती आहे की, तिला थाबंवणे शक्य नाही. परंतु भूकंपाची पूर्वकल्पना मिळाली, तर माेठी जीवित हानी टळू शकते. आता ते शक्य हाेणार आहे. टेक जायंट Google ने यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्याद्वारे भूकंप येण्यापूर्वी त्याची माहिती मिळेल. असे झाले, तर भूकंपावेळी संरक्षण मिळू शकते.
Google ने भारतात आपली अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम लाॅंच केली आहे. ते भूकंपाची अगाेदर चेतावणी देईल. हे फीचर लाेकांना भूकंपाची अगाेदर माहिती देईल. त्यामुळे लाेक सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतील. भूकंपामुळे आतापर्यंत झालेली जीवित आणि मालमत्तेची हानी लक्षात घेता हे वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते.
Google ने NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि NSC राष्ट्रीय भूकंप केंद्र यांच्याशी सल्लामसलत करून ते भारतात जारी केले आहे. मात्र, सध्या हे फीचर फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठी जारी केले आहे. भूकंप आला हे ओळखण्यासाठी अँड्रॉईड स्मार्टफाेनमध्ये सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे. भूकंप आल्याचे जाणवल्यावर त्वरीत Google च्या अर्थक्वेक डिटेक्शन सर्व्हरला सिग्नल पाठवले.
Google ची भूकंप सूचना प्रणाली अँड्रॉइड स्मार्टफाेनमध्ये उपस्थित असलेल्या एक्सलेराेमीटरचा वापर करेल. त्याच्या मदतीने हे फीचर यूजर्संना भूकंपाबाबत अगाेदरच सावध करणार आहे. Google ने हे फीचर यापूर्वी अनेग देशांमध्ये जारी केले आहे. Google यूजर्संना दोन प्रकारचे अलर्ट पाठवेल. त्यात एक सावधगिरीचा आणि दुसरा संदेश कारवाई करा, असा असेल.