17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आयोजित सीएटीसी-227 प्रशिक्षण शिबिर ‘बीटीआर’ इथं झालं. राज्य सरकारच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी शिबिरात सहभागी हाेऊन कॅडेट्सना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित केले. 17 महाराष्ट्र बटालियनचे सीईओ कर्नल चेतन गुरुबक्ष अध्यक्षस्थानी होते. बटालियनचे लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग, सुबेदार मेजर लोकिंदर आणि अधिकारी उपस्थित होते.
पाेपटराव पवार म्हणाले, “जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देण्यासाठी व मिळण्यासाठी प्रत्येक घरात किमान एक एनसीसी कॅडेट असला पाहिजे. मी स्वतः एनसीसी कॅडेट्स आहे. एनसीसीच्या प्रशिक्षणामुळे युवक याेग्य दिशेने काम करताे. राष्ट्र निर्माणच्या विविध पातळीवर एनसीसीचे योगदान अतिशय मोलाचे आणि रचनात्मक आहे”. एनसीसी युवकांमध्ये साहस, चारित्र्य, मैत्री, बंधुता, भाईचारा, अनुशासन, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आदी जीवन मूल्य रुजवतात. एनसीसी देशासाठी संघटीत, प्रशिक्षित आणि प्रेरित युवा शक्ती किंवा मानव संसाधन निर्माण करत आहे आणि संरक्षण दालनमध्ये भारती होण्यासाठी पुरेस वातावरण निर्माण करून देते, असेही पाेपटराव पवार म्हणाले.