देशातील सर्वाधिक अप्रत्यक्ष कर नाेटीस जीएसटी (GST) इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGCI) बजावली आहे. ही नोटीस तब्बल 55 हजार काेटींच्या वसुलीसाठी आहे. ऑनलाईन रियल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आल्या असून, यात फॅंटेसी स्पाेर्ट्स फ्लॅटफाॅर्म ड्रीम 11 चा देखील समावेश आहे. यात ड्रीम 11 कडे 25 हजार काेटींपेक्षा अधिक रकमेची जीएसटी नाेटीस पाठवण्यात आली आहे.
DGCI ने आरएमजी कंपन्यांकडून मागितलेल्या GST च्या रकमेचा आकडा हा 1 लाख राेटी रुपयांपर्यंत पाेहाेचू शकताे. अधिकाऱ्यांकडून डीआरसी-1 (अ) अर्जाच्या माध्यमातून कर सूचना जारी केली जाते. GST च्या भाषेत याला कारणे दाखवा पूर्वीची नाेटीस म्हणतात. ही नाेटीस ड्रीम 11 ला देखील पाठवण्यात आली आहे. ड्रीम 11 ने यावर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रियल मनी गेम्ससाठी GST च्या दरांमध्ये नुकतेच बदल करण्यात आले आहेत. आरएमजी प्लॅटफाॅर्म्सवर प्रत्येक गेमिंक सेशनवर एंट्री लेव्हलवर लावण्यात आलेल्या एकूण रकमेवरील GST 28 टक्क्यापर्यंत वाढवण्याची नाेटी जारी करण्यात आली आहे.
ड्रीम 11 ची सर्वात माेठी टॅक्स डिमांड नाेटीस आहे. ती 21 हजार काेटींची आहे. ग्रेम्सक्राफ्टला ही नाेटीस बजावण्यात आली हाेती. याविराेधात कंपनीने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 6 सप्टेंबरला GST मागणी रद्दसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. दरम्यान 15 सप्टेंबरला गेम्सक्राफ्टनं त्यांचे सुपरअॅप गेमजी बंद केले आहे.