सार्वजनिक क्षेत्रातील माेठ्या तीन बॅंकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) दंड ठाेठावला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बॅंक आणि पंजाब अँड सिंध बॅंकला दंड ठाेठवला आहे.
SBI ला 1.3 काेटी रुपयांचा दंड ठाेठावला आहे. हा दंड कर्ज आणि आगाऊ-वैधानिक आणि इतर निर्बंध तसेच आंतर-समूह व्यवहार आणि कर्ज व्यवस्थापनावर जारी केलेल्या सूचनांच्या तरतुदींचे पालन केल्याने ठाेठावण्यात आला आहे.
इंडियन बॅंकेला कर्ज आणि आगाऊ-वैधानिक आणि इतर निर्बंध, आरबीआयचे नाे-याेर केवाईसी निर्देश 2016 आणि आरबीआय (ठेवींवर व्याज दर0 निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल भारतीय बॅंकेला दंड 1.62 काेटी रुपयांचा ठाेठावला आहे. याचबराेबर पंजाब आणि सिंध बॅंकेला 1 काेटी रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी याेजनेतील काही तरतुदींचे पालन न केल्याने पंजाब आणि सिंध बॅंकेला हा दंड ठाेठावण्यात आला आहे. केंद्रीय बॅंकेने Fedbank Financial Services Ltd. तसेच 8.80 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नाॅन-बॅकिंग वित्तीय कंपन्यांमधील (NBFC) फसवणूक राेखण्यासाठी काही तरतुदींचे पालन न केल्याने हा दंड ठाेठावण्यात आला आहे.