सर्वाेच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबराेबरच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबची कालमर्यादा निश्चितीचा आदेश दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कार्यवाही अपेक्षित आहे. मला जेवढा पाहिजे, तेवढा वेळ घेईल. यावर काेणतीही संस्था मला राेखू शकत नाही, असे राहुल नार्वेकर म्हणत आहे. राहुल नार्वेकर यांच्या या प्रतिक्रियेवर ठाकरे गटाचे वकील असीम सराेदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
असीम सराेदे म्हणाले, “संवैधानिक तरतुदीनुसार न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वेळेची मर्यादा घालू शकत नाही. एकप्रकारे विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही. तसा न्यायालयाला अधिकार नाही. सर्वाेच्च न्यायालय आपल्याला आदेश देऊ शकत नाही, हे नार्वेकरांना माहित आहे. त्याचाच गैरफायदा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत”. परंतु सर्वाेच्च न्यायालयाने याबराेबर एक म्हणणे देखील मांडले आहे. त्याचा विसर नार्वेकरांना पडू नये. विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर वागण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या कामकाजाचे विश्लेषण करण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळे 28 किंवा 29 तारखेला नार्वेकर अपात्रतेबाबतच्या सुनावणीची तारीख निश्चित करतील, असेही सराेदे म्हणाले.
‘राहुल नार्वेकर यांनी कितीही वेळकाढूपणा करत आहे. त्यांना संविधान मानायचे नाही. पळून गेलेल्या आमदारांना लाेकांनी मनातून केव्हाच अपात्र केले आहे. त्यामुळे आमदारांना निवडणूक अत्यंत कठीण जाणार आहे. पैशांचा खेळ जास्त दिवस चालणार नाही. हे भारतीय लाेकशाही दाखवून देईल’, असेही वकील असीम सराेदे यांनी सांगितले.