इस्त्राेने चांद्रयान 3 च्या विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु संपर्क हाेत नाहीत. सिग्नल मिळत नाही. 22 आणि 23 सप्टेंबर, अशी गेल्या दाेन दिवसांपासून इस्त्राे विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रोने 23 ऑगस्टला चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरला दक्षिण ध्रुवावर उतरवले. यानंतर 11 दिवस प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभूमीची, जमिनीखाली असलेल्या खनिजांची, भूकंपाबाबतची माहिती इस्रोला पाठवली.
इस्त्राेने चांद्रयान 3 हे मिशन सात सप्टेंबरपर्यंत डिझाईन केले हाेते. पण त्याच्या काही दिवस अगाेदरच इस्रोने विक्रम आणि प्रज्ञानचे स्विच बंद केले. यानंतर लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये गेले. 14 दिवसांनंतर चंद्रावर सकाळ होईल आणि दोघांना पुन्हा ऍक्टिव्ह करता येतील, असा विचार इस्रोतील शास्त्रज्ञांनी केली हाेता. चंद्रावर काल सकाळ झाली. तेव्हापासून इस्रो विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क साधत आहेत. पण अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.
स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई म्हणाले, “विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क होण्याची शक्यता 50-50 टक्के आहे. संपर्क न झाल्यास नुकसान नाही. मिशन अगाेरदच पूर्ण झाले आहे. जर संपर्क झाल्यास विक्रम आणि प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर आणखी प्रयोग करतील”. अगाेदरप्रमाणे काम करतील आणि अतिरिक्त माहिती पाठवतील. पण तसे न झाल्यास ते चंद्राच्या पृष्ठभागावर कायमस्वरुपी भारताचे राजदूत म्हणून राहतील, असेही निलेश देसाई यांनी म्हटले.