पृथ्वी बुडणार, प्रलय येणार, त्सुनामी येणार, भूंकप, ज्वालामुखीचा उद्रेक हाेणार, पाण्याखाली जाणार, अशी पृथ्वीच्या विनाशाबद्दल चर्चा नेहमीच हाेत असते. आता मात्र वैज्ञानिकांनी एक धक्कादायक इशारा दिला आहे. पृथ्वीवर माेठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. अंतराळातील एक छाेटा लघुग्रह (किंवा उल्का) अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या लघुग्रहामध्ये तब्बल 22 अणूबाॅम्ब इतकी शक्तीशाली आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर विनाश हाेईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
हा लघुग्रह पृथ्वीला कधी धडकणार याची तारीख देखील शास्त्रज्ञांनी दिली आहे. बेन्नू नावाचा हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. दर सहा वर्षांनी ताे पृथ्वीच्या जवळून जात असताे. मात्र त्याच्या परिक्रमेच्या मार्गात सातत्याने बदल हाेत आहेत. त्यामुळे एक दिवशी हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा पृथ्वीला धडकला, तर एक भले माेठे छिद्र पृथ्वीला पडू शकते.
पृथ्वीवर एकाच वेळी 22 अणूबाॅम्बची ताकद असलेला हा लघुग्रह आदळल्यास विनाश हाेईल. ‘बेन्नू’ हा लघुग्रह पृथ्वीवर धडकल्यास 1200 मेगाटन टीएनटी इतकी ऊर्जा उत्सर्जित होईल. हिरोशिमाच्या अणुबॉम्ब विस्फोटापेक्षा ही ऊर्जा 100 पटीने अधिक असेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा लघुग्रह आजपासून 159 वर्षांनी पृथ्वीला धडक देईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
24 सप्टेंबर 2182 राेजी हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू नये म्हणून नासा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीचे 4.5 अब्ज वर्षापासून अस्तित्व आहे. मात्र आतापर्यंत केवळ 190 लघुग्रह पृथ्वीला धडकले आहेत. यातील तीन लघुग्रहांचा आकार खूप माेठा हाेता. त्यामुळे पृथ्वीवर माेठा विनाश झाला हाेता.