चांद्रयान 3 मधील विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान राेव्हर रिलाॅंचबद्दल उत्सुकता आहे. विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान राेव्हर Sleep Mode असून आज शुक्रवारी जागे झाले नाहीत. आता पुन्हा उद्या शनिवारी (23 सप्टेंबर) जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले.
चंद्रावर आता सकाळ झाली आहे. प्रकाशही पूर्ण आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम लँडर आहे. तिथे सूर्यप्रकाश पोहोचला आहे. तरी देखील विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान राेव्हरला अद्यापही गरज हवी तितकी ऊर्जा मिळत नाही. 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावरून जेवढी माहिती प्रज्ञान राेव्हरने पाठवली त्यानंतर चांद्रयान 3 स्लीप माेडवर गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 120 ते 220 डिग्री सेल्सिअस एवढे आहे. यामुळे यंत्रामध्ये बिघाड हाेण्याची शक्यता आहे. या तापमानाचा विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान राेव्हरवर किती परिणाम झाला याची माहिती चांद्रयान 3 पुन्हा जागे झाल्यावर समजणार आहे.
अलसुबह यूरोपियन स्पेस एजेंसी (ESA) च्या कोरोऊ स्पेस स्टेशनमधून चांद्रयान 3 च्या लॅंडर विक्रमला सतत संदेश पाठवले जात आहेत. मात्र लॅंडरकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही. खगाेलशास्त्रज्ञ स्काॅट टिली यांनी दावा केला आहे की, रेडिओ फ्रिक्वेन्सी हवी तितकी मजबूत नाही चांद्रयान 3 चॅनेलवर 2268 मेगाहर्ट्झ उत्सर्जित होत असून, हा एक कमकुवत बँड आहे. याचा अर्थ चांद्रयान 3 च्या लँडरकडून अद्याप मजबूत सिग्नल मिळालेला नाही, असेही स्काॅट टिली यांनी म्हटले आहे.