गणेशाेत्सवाच्या काळात इंधन दरवाढ झाली आहे. महागाईने अगाेदर पिचलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर या दरवाढीचा थेट परिणाम हाेणार आहे. आंतरराष्ट्रीय घडमाेडींचा परिणाम थेट इंधन दरवाढीवर सुरू झाला आहे. अमेरिकन डाॅलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी यासह इतर सर्व घटकांचा परिणाम हाेताे, तेव्हा इंधन दरवाढ हाेते. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा देशात इंधनाच्या किमती वाढतात. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले इंधन दर आज वाढले आहे. नवीन इंधन दर आज पहाटे सहा वाजल्यापासून लागू झाले आहे.
अहमदनगरमध्ये पेट्राेलचे प्रति लिटर दर 106.47 रुपये, तर डिझेल 92.98 रुपये झाले आहे. अकाेला इथं पेट्राेल प्रति लिटर 106.24 रुपये, तर डिझेल 92.79 रुपये झाले आहे. अमरावतीत पेट्राेल 107.50 रुपये, तर डिझेल 93.99 रुपये, औरंगाबादमध्ये पेट्राेल 107. 11 रुपये, तर डिझेल 93.82 रुपये, भंडारा इथं पेट्राेल 106.69 रुपये, तर डिझेल 92.98 रुपये, बीडमध्ये 106.51 रुपये, तर डिझेल 92.98 रुपये, बुलढाणा इथं 106.44 रुपये, तर डिझेल 93.34 रुपये, चंद्रपूरमध्ये पेट्राेल 106.12, तर डिझेल 92.68 रुपये, धुळ्यात 106.65 रुपये, तर डिझेल 93.16 रुपये असणार आहे.
गडचिराेलीत पेट्राेल 107.03 रुपये, तर डिझेल 93.55 रुपये, गाेंदियात पेट्राेल 107.52 रुपये, तर डिझेल 94.02 रुपये, हिंगाेलीत पेट्राेल 107.19 रुपये, तर डिझेल 93.70 रुपये, जळगावमध्ये पेट्राेल 107.18, तर डिझेल 93.67 रुपये, जालनामध्ये पेट्राेल 107.16 रुपये, तर डिझेल 93.65 रुपये, काेल्हापूरमध्ये पेट्राेल 106.75 रुपये, तर डिझेल 93.28 रुपये, लातूरमध्ये पेट्राेल 106.86, तर डिझेल 93.37 रुपये, मुंबई शहरात पेट्राेल 106.31 रुपये, तर डिझेल 94.27 रुपये, नागपूरमध्ये पेट्राेल 106.45 रुपये, तर डिझेल 92.99 रुपये, नांदेडमध्ये पेट्राेल 108.21 रुपये, तर डिझेल 94.39 रुपये, नंदुरबारमध्ये पेट्राेल 106.84 रुपये, तर डिझेल 93.34 रुपये, नाशिकमध्ये पेट्राेल 106.42 रुपये, तर डिझेल 92.93 रुपये, उस्मानाबादमध्ये पेट्राेल 106.39 रुपये, तर डिझेल 93.70 रुपये, पालघरमध्ये पेट्राेल 105.94 रुपये, तर डिझेल 92.87 रुपये असणार आहे.
परभणीत पेट्राेल 108.03 रुपये, तर डिझेल 94.49 रुपये, पुण्यात पेट्राेल 106.61 रुपये, तर डिझेल 93.11 रुपये, रायगडमध्ये पेट्राेल 106.87 रुपये, तर डिझेल 93.33 रुपये, रत्नागिरीत पेट्राेल 107.85 रुपये, तर डिझेल 94.33 रुपये, सांगलीत पेट्राेल 106.51 रुपये, तर डिझेल 93.04 रुपये, सातारामध्ये पेट्राेल 106.47 रुपये, तर डिझेल 92.97 रुपये, सिंधुदुर्गमध्ये पेट्राेल 108.01 रुपये, तर डिझेल 94.48 रुपये, साेलापूरमध्ये पेट्राेल 106.92 रुपये, तर डिझेल 93.43 रुपये, ठाण्यात पेट्राेल 106.49 रुपये, तर डिझेल 92.47 रुपये असणार आहे.
वर्ध्यात पेट्राेल 106.40 रुपये, तर डिझेल 93.35 रुपये, वाशिममध्ये पेट्राेल 107.07 रुपये, तर डिझेल 93.51 रुपये आणि यवतमाळमध्ये पेट्राेल 107.30 रुपये, तर डिझेल 93.80 रुपये झाले आहे.