मांढरदेव इथल्या काळुबाई मंदिराचा गाभारा पुढील आठ दिवस बंद असणार आहे. त्यामुळे देवीचे मुख दर्शन भाविकांना हाेणार नाही. गाभाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेतला असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. गाभारा हा आज गुरुवार (ता. 21) बंद करण्यात आला आहे.
या कालावधीत मांढरदेव इथल्या काळुबाई मंदिर बंद असले, तरी भाविकांना गडावर येता येणार आहे. तेथून बाहेरून दर्शन घेता येईल. मात्र गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही. भाविकांची गैरसाेय नकाे म्हणून सभामंडपात उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ हाेईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
मांढरदेव इथल्या काळुबाई मंदिराचा गाभारा हा 28 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या काळात भाविकांनी गडावरून येताना काळजी घ्यावी. भाविकांनी मंदिर आणि मंदिर समितीला या कालावधीत सहकार्य करावे. गाभारा दुरुस्ती हाेताच, सर्व भाविकांना मंदिर खुले केले जाणार आहे. गाभारा दुरुस्तीचा सर्वाधिक आनंद भाविकांना हाेईल, असेही मंदिर समितीकडून सांगण्यात आले.